तरुण भारत

त्रिपुरामध्ये मंत्रिमंडळात विस्तार होण्याची शक्यता

अगरतळा : त्रिपुरा सरकारमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. राज्यात कॅबिनेट विस्तार आणि संघटन पातळीवर जबाबदाऱयांचे पुनर्वाटप यासारखे निर्णय लवकरच घेतले जाऊ शकतात. पक्षाच्या काही नाराज नेत्यांच्या विरोधानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतःचा प्रतिनिधी दोन दिवसांसाठी राज्याच्या दौऱयावर पाठविला आहे. यापूर्वी देखील काही आमदारांनी दिल्लीत धाव घेत मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्याविरोधात तक्रार केली होती.  राज्यात मागील काही महिन्यांपासून भाजपमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. याचमुळे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बी.एल. संतोष यांच्या नेतृत्वाखालील पथक त्रिपुरामध्ये पोहोचले आहे. या पथकाकडून मंत्रिमंडळ विस्तार आणि जबाबदारीचे पुनर्वाटप यासारखे निर्णय घेतले जाऊ शकतात.

Related Stories

राज्यात दहावी परीक्षा आजपासून

Patil_p

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त

datta jadhav

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

Amit Kulkarni

देशात 47,262 नवे बाधित

datta jadhav

संरक्षण समितीच्या बैठकीतून राहुल गांधी यांचे वॉकआऊट

Patil_p

TMC च्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

datta jadhav
error: Content is protected !!