तरुण भारत

चीनचे 3 अंतराळवीर अंतराळासाठी रवाना

ड्रगनची महत्त्वाकांक्षी मोहीम : अंतराळ स्थानकाची निर्मिती पूर्ण करणार

वृत्तसंस्था / बीजिंग

Advertisements

चीनने 5 वर्षांनी पुन्हा स्वतःच्या अंतराळवीरांना एका विशेष मोहिमेसाठी अंतराळात रवाना केले आहे. लाँग मार्च-2एफवाय12 रॉकेट शेनझोऊ-12 अंतराळयान तसेच तीन अंतराळवीरांसह गुरुवारी रवाना झाले आहे. हे अंतराळवीर चीनकडून निर्माण होणारे नवे अंतराळ स्थानक तियान येथे पोहोचतील.

लाँग मार्च रॉकेट दक्षिण पश्चिम चीनच्या गांसू प्रांतातील गोबी वाळवंटातून झेपावले आहे. तिन्ही अंतराळवीर 90 दिवसांपर्यंत अंतराळात राहणार आहेत.

चिनी सैन्याचे सदस्य

अंतराळयान जियुक्वान सॅटेलाइट लाँचिंग सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आले आहे. यात तीन अंतराळवीर हॅशेंग, लियु बोमिंग आणि तांग होंग्बो हे चीनच्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी रवाना झाल्याची माहिती चायना मॅन्ड स्पेस एजेन्सीचे सहाय्यक संचालक जि किमिंग यांनी दिली आहे. मोहिमेचे कमांडर हॅशेंग पीपल्स लिबरेशन आर्मीत वैमानिक आहेत. यापूर्वीही त्यांनी दोन अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. तर लियु बोमिंग आणि तांग होंग्बो देखील सैन्याचे सदस्य आहेत.

चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

प्रक्षेपणापूर्वी तिन्ही अंतराळवीरांनी समर्थक आणि अंतराळ मोहिमेत सामील सहकाऱयांना अभिवादन पेले आहे. यादरम्यान त्यांनी चीनचे देशभक्ती गीत ‘विदाउद द चायनीज कम्युनिस्ट पार्टी, देयर वुड बी नो न्यू चायना’ म्हटले आहे. चीनचे नवे अंतराळ स्थानक पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे. या स्थानकाद्वारे चीन पूर्ण जगावर नजर ठेवू शकेल. तसेच जुन्या होत चाललेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची स्पर्धा करू शकणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नासा, रशियाची रोस्कोमोस, जपानची जाक्सा, युरोपची ईएसए आणि कॅनडाच्या सीएसएचा प्रकल्प आहे.

Related Stories

सुमिता मित्रांना युरोपियन पुरस्कार

Patil_p

‘कोविशिल्ड’ला दक्षिण आफ्रिकेतही मंजुरी

datta jadhav

केवळ 6 केसांना 10 लाखांची किंमत

Patil_p

हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

datta jadhav

अमेरिकेत महामारीचा कहर

Patil_p

लंडनच्या विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय

Patil_p
error: Content is protected !!