तरुण भारत

हा ‘चमत्कार’ नव्हे तर काय?

मुलाच्या कथित पार्थिवाला आईने कवटाळले : काही वेळातच श्वासोच्छ्वास सुरू

वृत्तसंस्था / बहादूरगढ

Advertisements

हरियाणात एक चमत्कारच घडल्याचे म्हटले जात आहे. तेथे एका मातेची आर्त साद देवाने ऐकली असेच म्हणावे लागेल. 20 दिवसांपूर्वी तिच्या 6 वर्षीय मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. कुटुंब अंत्यसंस्काराची तयारी करत होते. आई स्वतःच्या मुलाचा पार्थिवाला गोंजारून वारंवार ‘उठ माझ्या मुला उठ’ असे म्हणत होती. तेव्हाच्या त्याच्या शरीरात हालचाल सुरू झाली. पुन्हा उपचार सुरू झाला आणि मंगळवारी तो रोहतकच्या रुग्णालयातून हसत-खेळत स्वतःच्या घरी परतला आहे.

ही घटना हरियाणाच्या बहादुरगढ येथील आहे. तेथील रहिवासी हितेश आणि त्यांची पत्नी जान्हवी यांच्या मुलाला टायफाइल झाला होता. त्याला उपचारासाठी दिल्ली येथे नेण्यात आले होते. 26 मे रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मृतदेहावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. पण आजीने अंत्यदर्शनाचा हट्ट धरल्याने नातवाचा मृतदेह घरी आणला गेला होता. 

अत्यंसंस्काराची तयारी..

मृतदेह रात्रभर ठेवण्यासाठी बर्फ आणि सकाळी दफन करण्यासाठी मिठाची व्यवस्था करण्यात आली होती. लोकांना स्मशानभूमीवर पोहोचण्यास सांगण्यात आले होते अशी माहिती मुलाचे आजोबा विजय शर्मा यांनी दिली आहे. मुलाची आई आणि आजी रडत कथित पार्थिवाला वारंवार प्रेमाने हलवून  परत येण्याची साद घालत होती. काही वेळानंतर पॅक असलेल्या मृतदेहात हालचाल जाणवली. त्यानंतर वडिल हितेश यांनी मुलाचा चेहरा चादरीच्या पॅकिंगमधून बाहेर काढत त्याला तोंडाने श्वास देण्यास सुरुवात केली. शेजाऱयाने मुलाच्या छातीवर दाब देण्यास प्रारंभ केला होता. याचदरम्यान मुलाने स्वतःच्या वडिलांच्या ओठांवर दात रोवले.

गावात आनंदाचे वातावरण

मुलाचे वडिल हितेश स्वतःच्या ओठांवरील मुलाने दिलेला व्रण दाखवून आनंद साजरा करत आहेत. तर आजोबा विजय याला चमत्कार सांगत आहेत. देवानेच माझ्या मुलाला पुन्हा श्वास दिला असल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे. तर पूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

श्वास परतला पण…

26 मे रोजी रात्रीच मुलाला रोहतक येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मुलगा वाचण्याची शक्यता केवळ 15 टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. उपचार सुरू होताच वेगाने रिव्हकरी झाली आहे. आता तो पूर्णपणे बरा होऊन मंगळवारी घरी परतला आहे.

Related Stories

भारतात लसीची ऍनिमल ट्रायल सुरू

Patil_p

उत्पादन क्षेत्राचा 8 वर्षांमधील उच्चांक

Patil_p

‘आत्मनिर्भर भारत’ ठरला ऑक्सफोर्डचा हिंदी शब्द

Patil_p

नुसरत जहांचे संसद सदस्यत्व रद्द करा!

Patil_p

देशात 80 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

‘तौत्के’चे अतितीव्र वादळात रुपांतर

Patil_p
error: Content is protected !!