तरुण भारत

अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात गाझियाबाद प्रकरणी तक्रार

उत्तर प्रदेश पोलिसांची माहिती, इतरांवरही कारवाईची शक्यता

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्हय़ातील लोनी येथे एका मुस्लीम व्यक्तीला काही हिंदूंनी मारहाण केल्याच्या बनावट व्हिडीओ प्रकरणी स्वरा भास्कर नामक हिंदी चित्रपट अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्यासह ट्विटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी व इतर काही मान्यवरांविरोधातही तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत.

मारहाणीची ही घटना 5 जूनची आहे. त्यादिवशी लोनी या गावात अब्दुल समद सुफी नामक एका प्रौढाला काही व्यक्तींनी मारहाण करून याची दाढी कापली होती. मारहाण झालेल्या व्यक्तीवर ‘जय श्रीराम’ असे म्हणण्याची सक्ती करण्यात आली होती आणि त्या व्यक्तीने नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली, असे प्रारंभी भासविण्यात आले. तथापि नंतर पोलिसांनी मारहाण करणाऱया व्यक्तींना अटक केली तेव्हा तेही मुस्लीमच असल्याचे उघड झाले होते. तसेच ही मारहाण कोणत्याही धार्मिक करणास्तव झालेली नसून व्यक्तिगत वादातून झाली असल्याचेही स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन पोलिसांनी केले होते.

मात्र, ही माहिती उघड होण्याआधी अनेक वृत्तवाहिन्या, वेबसाईटस्, ट्विटर व इतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ त्यातला आवाज बंद करून प्रसारित करण्यात आला होता आणि तो खरा आहे की नाही याची शहानिशा न करता अनेक मान्यवरांनी त्यावर हिंदू धर्माची बदनामी करणाऱया प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या. स्वरा भास्कर हिने ‘हिंदू म्हणून जन्माला आल्याची लाज वाटते’, अशी प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे आता या मान्यवरांविरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी सादर केल्या आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

खरा प्रकार वेगळाच

सुफी या व्यक्तीला मारहाण करणारे मुस्लीमच होते असे त्यांना अटक झाल्यानंतर स्पष्ट झाले. सुफी ही व्यक्ती ताईत बनवून देत असे. तो ताईत परिधान केलेल्या व्यक्तीच्या घरी दुर्घटना घडली होती. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने आपल्या साथीदारांसह सुफी याला मारहाण केली होती. तथापि, नंतर याला धार्मिक रंग देण्यात आला. त्यामुळे दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान करण्याचा गुन्हा आरोपींविरोधात इतर गुन्हय़ांसह सादर करण्यात आला आहे.

मान्यवर व्यक्ती कचाटय़ात स्वरा भास्कर, ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक माहेश्वरी यांच्यासह ‘द वायर’ या वेब वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार मोहम्मद झुबेर आणि राणा आयुब तसेच ज्येष्ठ लेखिका सबा नक्वी, काँगेस नेते सलमान निझामी, मस्कूर उस्मानी आणि समा मोहम्मद यांच्या विरोधात हा व्हिडीओ शेअर केल्यासाठी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशीही माहिती गाझियाबाद आणि दिल्ली पोलिसांनी दिली.

Related Stories

‘सीमाशुल्क’च्या ताब्यातील 1.10 कोटींचे सोने गायब

Patil_p

उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास राज्यांनी हत्यारं विकत घ्यावी का ? ; अरविंद केजरीवालांचा संतप्त सवाल

triratna

डिजिटल मतदार ओळखपत्र आजपासून मिळणार

Patil_p

चीनविरोधात ‘बंदी’युद्ध

Patil_p

लालूंच्या जामिनावर 11 डिसेंबरला सुनावणी

Patil_p

कोरोनाने अनाथ झालेली मुले आणि वृद्ध दाम्पत्यांची जबाबदारी दिल्ली सरकार घेणार : मुख्यमंत्री

pradnya p
error: Content is protected !!