तरुण भारत

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक

लोणावळ्यातुन एनआयएच्या पथकाने घेतले ताब्यात अंधेरीतील घरातून तांत्रिक पुरावे जप्त : मनसुख हिरेन हत्येचा मास्टरमाइंड असल्याची शक्यता

प्रतिनिधी / मुंबई

Advertisements

अँटेलिया स्फोटके व हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याना अटक केली आहे. एनआयच्या एका पथकाने शर्मा याच्या अंधेरी येथील घरावर छापे टाकून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. तर दुसऱया पथकाने लोणावळ्याच्या रिसॉर्टवरुन शर्मा याना ताब्यात घेत सात तासांच्या चौकशीअंती अटक केली. तो मनसूख हिरेन हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचा एनआयएला संशय आहे. तर आतापर्यंत या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या 10 झाली आहे.

शर्मा याच्यासह सतिश आणि मनिष याना एनआयए न्यायालयाने 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी ठोठावली. सकाळी सहापासून अकरावाजेपर्यंत एनआयएने शर्मा याच्या घराची झाडाझडती घेत अनेक तांत्रिक पुरावे जप्त केले. सचिन वाझे आणि संतोष शेलार याच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचे नाव आल्याने एनआयएने ही कारवाई केली. तसेच मनसुख हिरेन हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. लोणावळय़ातील मोठय़ा रिसॉर्टमधून त्याला अटक केली असून हिरेन हत्येचा मास्टरमाईंड प्रदीप शर्मा होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव यांच्यासह सतिश आणि मनिष यानी हिरेन यांची हत्या करुन मफतदेह रेतीबंदर खाडीत टाकला.

शर्मा हे सचिन वाझेसह या सर्वांच्या जवळचे समजले जातात. शर्मा याचीही एनआयएने एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस चौकशी केली होती. गुरुवारी सकाळी दोन महिन्यांनी एनआयएने शर्माच्या घराची झडती आणि अटक ही कारवाई केली आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा 1983 साली पोलीस सेवेत रुजू झाले. पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख निर्माण झाली असून त्यानी 312 गुंडांचा एन्काऊंट केला आहे. कुख्यात गुंडांशी संबंध असल्याच्या आरोपातून 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबन झाल्यावर 2017 मध्ये क्लीनचिट देण्यात आली. त्याचवर्षी दाऊदच्या भावाला अटक केली. तर 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा देत नालासोपाऱयात शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तथापि स्फोटके आणि हिरेन हत्याप्रकरणी त्याना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

रक्तद्रव उपचार पद्धती उपाय नव्हे

Patil_p

जगन्नाथ रथयात्रेला परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

pradnya p

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Rohan_P

निर्भया : दोषींचे वकील पुन्हा कोर्टात

prashant_c

गगनयान मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता

datta jadhav

दिल्लीत गेल्या 24 तासात 340 नवे कोरोना रुग्ण; 04 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!