तरुण भारत

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट

दिवसभरात 67,208 बाधित : 2,330 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीची गती काहीशी कमी झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी सलग दहाव्या दिवशी एक लाखांहून कमी आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 67 हजार 208 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 2 हजार 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात 1 लाख 3 हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी मंगळवारी देशात 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.28 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 96 टक्के इतका आहे. एकंदर सक्रिय रुग्णांमध्ये झपाटय़ाने घट होत असून सध्या 8 लाख 26 हजार 740 इतके रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 313 इतक्या जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा 3 लाख 81 हजार 903 इतका झाला आहे. बुधवारी 1 लाख 03 हजार 570 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 2 कोटी 84 लाख 91 हजार 670 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Related Stories

मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav

कोरोनाच्या दुसऱया लाटेशी झुंज

Amit Kulkarni

बलात्कार आणि छेड काढणाऱ्या आरोपींबाबत योगी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप उद्या भारतात पोहचणार

triratna

जुलैअखेर राफेल भारतात दाखल होणार

Patil_p

आग्रा : भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण, 2000 जण क्वारंटाईन

prashant_c
error: Content is protected !!