तरुण भारत

मागील वर्षी 300 कोटी लोकांकडून अज्ञातांना मदत

वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स 2021 प्रसिद्ध :श्रीमंतांच्या तुलनेत गरीब देशांनी दाखवून दिले मोठे मन

कोरोना महामारीने जगभरातील लोकांमध्ये दान करण्याच्या वृत्तीला चालना दिली आहे. ब्रिटिश संस्था चॅरिटीज एड फौंडेशनच्या वर्ल्ड गिव्हिंग इडेक्स 2021 नुसार मागील वर्षी 2020 मध्ये जगातील 55 टक्के प्रौढ म्हणजेच सुमारे 300 कोटी लोकांनी अज्ञातांना मदत केली आहे. 31 टक्के लोकांनी रोख देणगी दिली आणि जगातील दर 5 व्या व्यक्तीने स्वैच्छिक स्वरुपाने समाजसेवेत वेळ घालविला आहे. संस्थेने 114 देशांमध्ये सर्वेक्षण केले आहे. यात सर्व देशांचे अज्ञात व्यक्तीला मदत करणे, रोख देणगी आणि स्वतःचा वेळ देत समाजसेवा करण्याच्या वृत्तीच्या पैलूवर आकलन करण्यात आले आहे.

Advertisements

गॅलपने प्रत्येक देशात किमान 1 हजार लोकांची मुलाखत केली आहे. एकूण 114 देशांमध्ये 1.21 लाख लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निर्देशांकात इंडोनेशिया सर्वात उदार देश ठरला आहे. येथील 83 टक्के लोकांनी रोख दान केले आहे. वेळ खर्च करत श्रमदान किंवा लोकांची मदत करण्यातही इंडोनेशिया (60 टक्के) अग्रस्थानी राहिला. रोख देणगीप्रकरणी म्यानमार दुसऱया क्रमांकावर तेथे बौद्ध धर्मातील थेरावडा पंथीय लोक दानप्रकरणी आघाडीवर आहेत. श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांच्या लोकांमध्ये इतरांना मदत करण्याचा कल अधिक राहिला.

अज्ञातांना मदत करण्याप्रकरणी पहिल्या 10 देशांमध्ये नायजेरिया, कॅमरून, जाम्बिया, केनिया, यूगांडा आणि इजिप्तचा समावेश आहे. बेल्जियम, स्वीत्झर्लंड, फ्रान्स, स्लोवेनिया, इटली, नेदरलँड्स आणि आइसलँडमध्येही अज्ञातांना मदत करण्याची वृत्ती कमी दिसून आली. जपान आणि माली यासारखे श्रीमंत देश दानप्रकरणी खूपच मागे आहेत.

भारताची मोठी झेप

भारत या निर्देशांकात मागील अनेक वर्षांपासून 82 व्या स्थानावर होता. पण 2020 मध्ये भारत 14 व्या स्थानी पोहोचला आहे. समाजसेवेसाठी वेळ देण्याप्रकरणी 6 व्या, रोख मदतीप्रकरणी 35 व्या आणि अज्ञातांना मदतीप्रकरणी भारताला 41 वे स्थान मिळाले आहे.

Related Stories

पंच्याऐंशी टक्के पालकांना कोविडची भीती

datta jadhav

गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर

pradnya p

तांदूळ आणि डाळींमधून साकारला भारताचा तिरंगी नकाशा

pradnya p

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रामेश्वर चौकातील मठात पाळणा, आकर्षक सजावट

pradnya p

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा

pradnya p

107 वर्षीय महिलेकडून शेतीचे धडे

Patil_p
error: Content is protected !!