तरुण भारत

हौसेला मोल नाही

जपानमध्ये दोन आंब्यांची किंमत अडीच लाख रुपये

जगात आंब्याच्या अशा काही जाती आहेत, ज्या सर्वात महागडय़ा आहेत. ‘ताईयो नो तामागो’ आंब्याची जात केवळ जपानच्या मियाजाकी प्रांतातही आढळते. याच्या दोन आंब्यांची जोडी अडीच लाख रुपयांपर्यंत मिळते. या आंब्यांचे पीक केवळ स्पेशल ऑर्डरवरच घेतले जाते, म्हणजेच हा आंबा सहजपणे खरेदी करता येत नाही. हा आंबा अर्धा लाल तर अर्धा पिवळय़ा रंगाचा असतो. जपानमध्ये याचे पीक उन्हाळा आणि हिवाळय़ादरम्यानच्या ऋतूत घेतले जाते, एका विशेष प्रकाराने त्याचे पीक घेतले जात असल्याने याची किंमत अत्यंत अधिक असते.

Advertisements

यांतर्गत आंब्याच्या झाडावर फळ येताच एकाएका फळाला जाळीदार कपडय़ांनी बांधले जाते. या आंब्याच वजन सुमारे 350 ग्रॅमपर्यंत असते. म्हणजेच केवळ 700 ग्रॅम म्हणजेच दोन आंब्यांची किंमत अडीच लाख रुपयांहून अधिक असल्यास एक किलोसाठी सुमारे 3 लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे. 2017 मध्ये या आंब्याच्या एका जोडीचा लिलाव करण्यात आला होता, ज्यात विक्रमी 3600 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 लाख 72 हजार रुपयांमध्ये आंबा विकला गेला होता.

Related Stories

देणगी मिळविण्यात डेमोक्रेट्सची बाजी

Patil_p

रॉकेट लाँचिंगसाठी चीनने बनवले तरंगणारे स्पेसपोर्ट

datta jadhav

अमेरिका हिंसाचार : 24 राज्यात 17 हजार सुरक्षा सैनिक तैनात

datta jadhav

अजबच!, सहारा वाळवंटच गोठले

Patil_p

‘परग्रहवासीयां’च्या पाऊलखुणांचा शोध घेतोय अमेरिका 1947 युएफओ क्रॅश

Patil_p

महामारीची तिसरी लाट

Patil_p
error: Content is protected !!