तरुण भारत

साळगाव मतदारसंघात मोफत खताचे वाटप

वार्ताहर / कांदोळी

साळगाव मतदारसंघातील माजी मंत्री दीलीप परुळेकर यांनी पुढाकार घेऊन साळगाव येथे गरजू शेतकऱयांना खरीप भातपिकांना मोफत युरिया खताचे वाटप करण्यात आले. काल साळगाव येथे भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जवळपास 100 शेतकऱयांना मोफत खताचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशियल डिस्टन्सींग पाणळय़ात आले.

Advertisements

दिलीप परुळेकर म्हणाले की, गेले चार वर्षे अनेक गरजू शेतकरी मोफत खतापासून वंचित राहिले पण यावर्षीसाळगाव मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रात खताचे वाटप करण्याचा संकल्प हाती घेण्यात अल्याचे श्री. परुळेकर यांनी सांगितले. गरजू शेतकऱयांना मोफत खत वाटप 17 जून पासून सुरू करण्यात आले आहे. साळगाव भाजप कार्यालयामध्ये सकाळी 10 ते दु. 3 वाजेपर्यंत करणार आहे. मतदारसंघातील शेतकरी बंधूंनी उपस्थित राहताना आधार कार्ड आणणे जरुरीचे आहे असे आवाहन श्री. परुळेकर यांनी केले आहे.

साळगाव वाडय़ातील अनेक शेतकरी, नागरिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील भाजपा कार्यकर्ते कार्यशील राहिले.

Related Stories

दाबामळ – कुडचडे येथे गांजा जप्त, एकास अटक

Patil_p

मासेमारी, मासेविक्रीस सरकारने परवानगी द्यावी

Patil_p

आयआयटी आंदोलन मोडीत काढण्याचे सरकारचे षडयंत्र

Patil_p

आंतरराष्ट्रीय कॉफी पेंटिंग स्पर्धेत कालिदास सातार्डेकर यांना पुरस्कार

Patil_p

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p

आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने

Amit Kulkarni
error: Content is protected !!