तरुण भारत

खांडेपार नदीवरील प्रकल्प होऊ देणार नाही

मुर्डी व अन्य वाडय़ांवरील तरुणांचा इशारा

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

जलसंवर्धन खात्यातर्फे मुर्डी खांडेपार येथे होऊ घातलेल्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून हा प्रकल्प झाल्यास मुर्डीसह आसपासच्या वाडय़ांवर त्यांचा परिणाम होणार आहे. ग्रामस्थांच्या पारंपरिक व्यावसायांना झळ बसणार असून नदी काठाजवळ असलेल्या घरांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. स्थानिकांना विश्वासात न घेताच  हा प्रकल्प लादला जात आहे. नियोजित प्रकल्प त्वरित रद्द न केल्यास त्याला जोरदार विरोध केला जाईल, असा इशारा मुर्डी भागातील काही तरुणांनी दिलेला आहे.

फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खांडेपार भागातील विलास गावडे, संतोष गावडे व सुनील गावडे यांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. खांडेपार नदीचे पात्र मांडवी नदीला जेथे मिळते, त्या भरती ओहोटीच्या तोंडावर मोठा बंधारा घालून पाणी अडविले जाणार आहे. खांडेपार नदीचे पाणी सावईवेरे पंचायत क्षेत्रातील शितोळे तळय़ापर्यंत नेऊन ते सावईवेरे व प्रियोळमधील काही गावांना पुरविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार असून पिण्याच्या पाण्यासह शेती बागायतीला शिंचनासाठी हे पाणी वापरले जाईल. प्रियोळ भागात पाणी पुरवठय़ासाठी आधीच गांजे नदीवर अशा प्रकारचा प्रकल्प असताना शंभर कोटी रुपये खर्चून अजून एका प्रकल्पाची गरजच काय? असा प्रश्न विलास गावडे यांनी उपस्थित केला. या प्रकल्पाचा खांडेपार भागातील मुर्डीसह इतर वाडय़ांना तसेच नदी पलिकडील उसगांव पंचायत क्षेत्रातील काही गावांवर विपरीत परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावात प्रकल्प उभारण्यापूर्वी जनसुनावणी होणे आवश्यक होते. स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची पूर्ण माहिती देणे गरजेचे होते. तसे न करता प्रकल्पाच्या कामाला प्राथमिक स्तरावर सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मातीच्या चाचणीसाठी आलेल्या काही लोकांना ग्रामस्थांनी पिटाळून लावले. यापुढेही प्रकल्पाचे काम सुरु झाल्यास त्याला जोरदार विरोध केला जाईल, असे विलास गावडे यांनी सांगितले.

प्रकल्प लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू – डॉ. केतन भाटीकर

डॉ. केतन भाटीकर म्हणाले, खांडेपार गावातील लोकांना विश्वासात न घेताच साधारण शंभर कोटींचा हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे तेथील नैसर्गिक जैवविविधतेवर परिणाम होणार आहे. सरकार हा प्रकल्प सक्तीने लादू पाहिल्यास केवळ खांडेपारच नव्हे, फोंडय़ातील नागरिकांच्या पाठिंब्याने हा प्रयत्न हाणून पाडला जाईल.

Related Stories

‘टीका उत्सव’ला दुसऱया दिवशीही चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

पेडणे रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय एकत्र आल्याने गोंधळ

Patil_p

राज्यात दीपोत्सवाला उत्साहात प्रारंभ

Patil_p

आरोलकरांच्या पक्ष प्रवेशाची सभा पोलिसांनी उधळली

Patil_p

पोळेतून 1550 नागरिक कर्नाटकात दाखल

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी 69 पर्यावरण संवेदनशील विभाग वगळले

Patil_p
error: Content is protected !!