तरुण भारत

महामार्ग समस्यांप्रकरणी मंत्री आजगावकरांकडून अधिकारी धारेवर

राष्ट्रीय महामार्गाजवळची कामे तसेच सर्व्हिस रोड करण्याचे दिले निर्देश

प्रतिनिधी /पेडणे

Advertisements

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पावसाळय़ात राष्ट्रीय महामार्गासबंधी नागरिकांना होणाऱया अडचणी तसेच गैरसोयींबाबत अधिकाऱयांना धारेवर धरले. तातडीने राष्ट्रीय महामार्गाजवळची कामे तसेच सर्व्हिस रोड करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱयांना दिले.

   पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा राज्यचे उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी गुरुवारी पेडणे येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये रस्ता बांधकाय कंपनी यांचे अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतले.

   यावेळी एम. व्ही. आर. कंपनीचे अधिकारी सी. ई. गुप्ता,  कंत्राटदार श्रीनिवास, अभियंता वेणूगोपाल, पेडणे पाणी विभाग अभियंता श्री. वॉल्सन, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, नगसेवक शिवराम तुकोजी, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, धारगळचे पंच सदस्य प्रदीप पटेकर, कोरगावचे उपसरपंच समील भाटलेकर, नगरसेवक माधव सिनाय देसाई तसेच विविध पंचायतीचे सरपंच, पंच आणि नागरिक उपस्थित होते.

पावसाळय़ात नागरिकांना त्रास नको : बाबू आजगावकर

 सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला  पावसाचे पाणी साचत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे.  यासाठी पाणी भरणाऱया ठिकाणी रस्ता दुरुस्त करावा. ज्याठिकाणी सर्व्हिस  रोड आहे, त्या ठिकाणी पावसाचे पाणी भरत असून त्या पाण्याला मार्ग मोकळा करून देण्याचे आदेश यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी रस्ता बांधकाम कंपनीला दिले.

ओशालबाग धारगळ येथील समस्या त्वरित सोडवा !

राष्ट्रीय महामार्गामुळे ओशालबाग येथे काही घरांसाठी सध्या ती घरे रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे पाणी भरल्याने समस्या निर्माण होत आहे. यावर कंपनीने त्वरीत तोडगा काढवा. जर त्या ठिकाणी कोणी काम करण्यास अडथळा आणत असतील तर पोलीस संरक्षणात ते काम करावे, असे आदेशही कंपनीच्या अधिका-यांनी यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिले. ओशालबाग येथे पाणी भरत असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी स्थानिक पंच सदस्य प्रदीप पटेकर यांनी केली. ओशालबाग येथे पाणी भरत असल्याने पाणी जाण्यासाठी वाट नाही. यामुळे त्याठिकाणी पाणी साचून राहते. बांधकाम कंपनीने यावर तोडगा काढावा, अशी सूचना प्रदीप पटेकर यांनी यावेळी केली.

Related Stories

गोव्याच्या पोलीस महासंचालक पदी मुकेशकुमार मीना

Rohan_P

काँग्रेस-मगो आपल्या बंडखोरोना रोखण्यासाठी डावपेच आखणार

Amit Kulkarni

दिव्यांगांना सर्व सुविधा त्वरित मिळाव्या

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतल्या अनेक केंद्रिय मंत्र्यांच्या भेटी

Patil_p

आरोग्य अधिकारी भासवून महिलेने घरात डांबून लुटले

Patil_p

मुख्यमंत्री केवळ स्वप्रतिमा उंचावण्यात व्यस्त

Patil_p
error: Content is protected !!