तरुण भारत

कोलवाळ पोलीस स्थानकाचे आज उद्घाटन

प्रतिनिधी /म्हापसा

बार्देश तालुक्यातील थिवी मतदारसंघासाठी नव्याने सुरू होत असलेल्या कोलवाळ पोलीस स्थानकाचे उद्घाटन आज क्रांतिदिनी शुक्रवार दि. 18 रोजी दु. 12.15 वा. मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते होणार आहे.

Advertisements

गोठणीचो व्हाळ कोलवाळ येथील जलसिंचन खात्याच्या इमारतीत हे पोलीस स्थानक सुरू होत असून ते काही दिवसांसाठी असेल त्यानंतर कोलवाळ येथेच नवीन इमारत बांधून तेथे स्थलांतर करण्यात येईल. त्यासाठी जागेची प्रक्रिया चालू आहे असे थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. उद्घाटन सोहळा छोटेखानी असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार निळकंठ हणर्ळकर, पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना तसेच मोजकेच काही निमंत्रित अधिकारी व पंचायत सदस्य उपस्थित असतील. म्हापसा पोलीस स्थानकाची कार्यक्षमता मोठी असल्याने म्हापसा पोलीस स्थानकावर फार मोठा ताण पडत होता. त्यासाठी या स्थानकाचे विभाजन करून एखादे नवीन पोलीस स्थानक निर्माण करावे असे सरकार दरबारी ठरले होते. त्यानुसार थिवी मतदारसंघासाठी नवीन पोलीस स्थानक निर्माण करण्याचे ठरले. विधानसभेतही या पोलीस स्थआनकावर चर्चा झाली होती. हे पोलीस स्थानक पूर्ण स्वरुपाचे असले तरी नवीन इमारत होईपर्यंत लोकअप म्हापसा सअथनकावरच असेल.

Related Stories

राज्यात ‘ब्लॅक फंगस’चे 10 रुग्ण

Amit Kulkarni

कंटेनमेंट झोनमधून झुआरीनगरातील भाग हटवा नागरिकांची मागणी

Omkar B

रेशन वितरणात गोवा नंबर वन!

Omkar B

आदर्श कृषी संस्थेने काल पहिल्याच दिवशी खरेदी केल्या 140 टन काजू

Omkar B

मतदारसंघ पुनर्रचना, राखीवता ठरवण्याचे नेमके काम कोणाचे?

Patil_p

कॅसिनोंसह किनारपट्टीत 144 चा फज्जा

Amit Kulkarni
error: Content is protected !!