तरुण भारत

कोरोना : 6 बळी, 254 बाधित

468 कोरोनामुक्त,3824 सक्रीय रुग्ण : बरे होण्याचे प्रमाण 95.85 टक्के

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

बऱयाच दिवसांनंतर कोरोनाबळींची संख्या पुन्हा एकदा एकअंकी संख्येवर आली असून गुरुवारी राज्यात 6 जणांचे बळी गेले आहेत. त्याचबरोबर बाधितांची संख्याही बऱयाच अंशी कमी झाली असून 254 बाधित सापडले आहेत तर त्याच्या दुप्पट म्हणजे 468 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 95.85 टक्क्यांवर पोहोचले आहे तर सक्रिय रुग्णसंख्या 3824 एवढी खाली आली आहे.

आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 163612 वर पोहोचली आाहे तर एकूण  156819 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरूवारी 2953 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 254 बाधित सापडले. त्यापैकी 28 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 226 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. त्याचबरोबर 41 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले आहेत.

गुरूवारी राज्यात अधिकृत 6 बळींची नोंद झाली तर 15 ते 23 मे 2021 या कालावधित खाजगी रुग्णालयात दगावलेल्या तिघांची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकूण 9 बळींची नोंद करण्यात आली. त्याद्वारे एकूण मृतसंख्या 2969 वर पोहोचली आहे. त्यातील 3 जण गोमेकॉत, तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, उत्तर गोव्यातील खाजगी इस्पितळ आणि बेतकी आरोग्य केंद्रात प्रत्येकी एका बळीचा समावेश आहे. या मृतांमध्ये सर्वजण 60 ते 71 वर्षे वयोगटातील आहेत. त्यात 3 पुरुष व 3 महिला रुग्णांचा समावेश आहे.

16 केंद्रात दोन अंकी रुग्णसंख्या

राज्यातील 33 पैकी 16 केंद्रातील रुग्णसंख्या सध्या दोनअंकी आकडय़ावर पोहोचली आहे. बहुतेक केंद्रातील रुग्ण झपाटय़ाने बरे होत असल्याने तेथील संख्या कमी होत आहे. सध्या सर्वाधिक 316 रुग्ण फोंडा केंद्रात आहेत. त्या खालोखाल पणजीत 251, मडगावात 235, आणि चिंबलमध्ये 220 रुग्ण आहेत. सध्या सर्वात कमी 32 रुग्ण कासारवर्णेत आहेत. डिचोली, पेडणे, वाळपई, म्हापसा, हळदोणे, बेतकी, कासारवर्णे, कोलवाळ, शिवोली, मये, बाळ्ळी, चिंचिणी, कुडतरी, मडकई, केपे व नावेली या केंद्रांत प्रत्येकी 100 पेक्षा कमी रुग्ण आहेत.

Related Stories

गोव्यात अडकलेल्या 426 पर्यटकांचे रशियाकडे प्रयाण

Omkar B

आपतर्फे पणजी आणि तालीगांवच्या 200 रिक्षा चालकांना मोफत रेशन किट वाटप

Amit Kulkarni

एका व्हिडियोने फातोर्डा सराव मैदान बनले चकाचक

Amit Kulkarni

मृत वाघांवर विषप्रयोग झाल्याचे उघडकीस

Patil_p

खलाशांच्या नातेवाईकांचे उपोषणाचे अस्त्र

Omkar B

सभापतींविरुद्ध आज सर्वोच्च न्यायालयात याचिका

Amit Kulkarni
error: Content is protected !!