तरुण भारत

उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा इटली पहिला संघ!

युरो चषक फुटबॉल स्पर्धा : स्वित्झलर्डंविरुद्ध 3-0 फरकाने एकतर्फी विजय, लोसाटेलीचे दुहेरी गोल

वृत्तसंस्था / रोम

Advertisements

फॉरवर्ड्स, मिडफिल्डर्स उत्तम खेळत असताना, दुसरीकडे राखीव खेळाडूंनी देखील उत्तम योगदान दिल्यानंतर जणू नवा चेहरामोहरा लाभलेल्या इटालियन ब्रिगेडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात स्वित्झर्लंडचा 3-0 असा फडशा पाडला. मिडफिल्डर मॅन्युएल लोसाटेलीने या लढतीत दुहेरी गोल केले व त्या बळावर इटली प्री-क्वॉर्टर्समध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. ही कामगिरी त्यांनी आणखी एक सामना बाकी असतानाच केली आहे. इटलीचा हा सलग 10 वा विजय ठरला असून मागील 29 लढतीपासून ते अपराजित राहिले आहेत.

‘माझ्या दिमतीला जागतिक दर्जाचे फुटबॉलचा आनंद लुटणारे काही अव्वल खेळाडू आहेत आणि हे मी माझे भाग्यच मानतो. असे खेळाडू हाताशी असल्याने खेळाचा आनंद लुटता येतो आणि धोकेही स्वीकारता येतात. यातच फुटबॉलची खरी गम्मत आहे’, अशी प्रतिक्रिया इटालियन प्रशिक्षक रॉबर्टो मॅन्सिनी यांनी दिली. इटलीला यापूर्वी 2018 विश्वचषकासाठी पात्रता सिद्ध करता आली नव्हती. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा केली आहे. अर्थात, फ्रान्स, पोर्तुगाल व बेल्जियमसारख्या सध्या बहरात असलेल्या संघांच्या तुलनेत आपल्या संघाला अद्याप बरीच प्रगती करावी लागेल, असे मॅन्सिनी यांचे परखड मत आहे.

इटलीतर्फे मॅन्युएल लोसाटेलीने 26 व्या मिनिटाला पहिला व 52 व्या मिनिटाला दुसरा असे प्रत्येक सत्रात एकदा गोलजाळय़ाचा वेध घेतला. त्यानंतर उत्तरार्धात सिरो इम्मोबाईलने 89 व्या मिनिटाला इटलीला आणखी एक गोल मिळवून दिला. इम्मोबाईलसाठी हा या युरो चषक स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा गोल ठरला. इटलीचा संघ आता अ गटात 6 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान असून त्यांनी यापूर्वी सलामीच्या लढतीत तुर्कीचा देखील 3-0 असा फडशा पाडला होता. वेल्सचा संघ 4 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. स्वित्झर्लंडच्या खात्यावर 1 गुण आहे तर तुर्कीला अद्याप खाते उघडता आलेले नाही.

Related Stories

उत्तराखंड बाद फेरीमध्ये दाखल

Patil_p

रिषभ, वॉशिंग्टनची नितांत ‘सुंदर’ फलंदाजी!

Patil_p

नेतृत्व विभागणीची संकल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही

Patil_p

उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी

Patil_p

करूणारत्ने- डिसिल्वा यांची त्रिशतकी भागिदारी

Patil_p

दुसऱया कसोटीसाठी बर्न्स पूर्ण तंदुरूस्त

Patil_p
error: Content is protected !!