तरुण भारत

वेल्सचा तुर्कीवर एकतर्फी विजय

वृत्तसंस्था /बाकू

ऍरॉन रॅमसे व कॉनर रॉबर्टस् यांनी दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल केल्यानंतर वेल्सने युरो चषक स्पर्धेतील साखळी सामन्यात तुर्कीचा 2-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. रॅमसेने पहिल्या सत्रात 43 व्या मिनिटाला पहिला गोल केला तर कॉनरने स्टॉपेज टाईममध्ये संघाचा दुसरा गोल नोंदवला. वेल्सचा कर्णधार गॅरेथ बॅलेने पेनल्टीची नामी संधी दवडली होती. पण, नंतर स्टॉपेज टाईममध्ये कॉनरला मोलाचा पास देत त्याने अपयशाची काही प्रमाणात भरपाई केली.

Advertisements

बाकूमध्ये संपन्न झालेल्या या लढतीत तुर्कीचे चाहते मोठय़ा प्रमाणात हजर होते. मात्र, तुर्कीचा संघ या लढतीत चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करु शकला नसल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. मागील आठवडय़ात वेल्स-स्वित्झर्लंड यांच्यातील अनिर्णीत लढतीला 8782 चाहते हजर होते.

Related Stories

मँचेस्टर सिटीचा निसटता विजय

Patil_p

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संचालकपदी ग्रीम स्मिथ

Patil_p

एएफसीच्या कोरोना मोहिमेत बाला देवीचा समावेश

Patil_p

सराव सामन्यात पावसाचा अडथळा

Patil_p

दियागो मारडोनाला रूग्णालयातून लवकरच डिस्चार्ज

Omkar B

न्यूझीलंडचे क्रिकेटपटू मालदीवमधून ब्रिटनला जाणार

Patil_p
error: Content is protected !!