तरुण भारत

शफालीचे शतक हुकले, स्मृतीचे अर्धशतक

महिलांची एकमेव कसोटी : इंग्लंडचा 9 बाद 396 धावांवर डाव घोषित, स्नेह राणाचे 4 बळी, भारत 5 बाद 187

वृत्तसंस्था /ब्रिस्टॉल

Advertisements

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीतील दुसऱया दिवशी भारताने दिवसअखेर 60 षटकांत 5 बाद 187 धावा जमविल्या. त्याआधी इंग्लंड महिला संघाने पहिला डाव 9 बाद 396 धावांवर घोषित केला होता.  

स्मृती मानधना (78) व शफाली वर्मा (96) यांनी भारताला दमदार सलामी देताना 167 धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव 1 बाद 167 वरून 5 बाद 183 असा गडगडला.  शफालीने आक्रमक खेळ करीत 152 चेंडूत 13 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 96 धावांचे योगदान दिले. कसोटी पदार्पणातच शतक नोंदवण्याची तिची संधी मात्र हुकली. नंतर स्मृतीदेखील उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाली. तिने 155 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार मारले. पूनम राऊत 2, शिखा पांडे 0, मिताली राज 2 धावा काढून बाद झाले. दिवसअखेर हरमनप्रीत 4 व दीप्ती शर्मा शून्यावर खेळत होते. हीदर नाईटने एका धावेत 2 बळी मिळविले.

या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 6 बाद 269 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून दुसऱया दिवसाच्या खेळास पुढे प्रारंभ केला. इंग्लंडने कॅथरिन ब्रंट (8) व सोफी एक्लेस्टोन (17) यांचे बळी सकाळच्या सत्रात गमावले, पण सोफिया डंकलीने शानदार फलंदाजी करीत भारतीयांना निराश केले आणि ती 74 धावांवर नाबाद राहिली. तिने अनया श्रबसोलसमवेत (47) नवव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने आदल्या दिवशीच्या धावसंख्येत 127 धावांची भर घातली. भारताच्या स्नेह राणाने 131 धावांत 4 बळी मिळविले तर दीप्ती शर्माने 3 बळी मिळविले. 

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड महिला प.डाव 121.2 षटकांत 9 बाद 396 (बीमाऊंट 66, हीदर नाईट 95, नॅट स्किव्हर 42, सोफिया डंकली नाबाद 74 (127 चेंडूत 9 चौकार), एक्लेस्टोन 17, श्रबसोल 47 (33 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), स्नेह राणा 4-131, दीप्ती शर्मा 3-65, पूजा वस्त्रकार 1-53, झुलन गोस्वामी 1-58. भारतीय महिला 60 षटकांत 5 बाद 187 -शफाली वर्मा 96 (152 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार), स्मृती मानधना 78 (155 चेंडूत 14 चौकार), पूनम, मिताली प्रत्येकी 2, हरमनप्रीत खेळत आहे 4, नाईट 1-2.

Related Stories

हरप्रीत ब्रारचा आरसीबीला ‘पंजाबी’ हिसका!

Patil_p

इनडोअर टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियात

Patil_p

सिंधू, श्रीकांत, समीर विजयी, सायना पराभूत

Patil_p

कोलकात्यात खेळताना प्रचंड दडपण असायचे : छेत्री

Patil_p

भारत- ऑस्ट्रेलिया कसोटीमालिकेला ऍडलेड किंवा ब्रिस्बेनमध्ये प्रारंभ होणार

Patil_p

अंमली पदार्थ बाळगल्याचा लंकन क्रिकेटपटूवर आरोप

Patil_p
error: Content is protected !!