तरुण भारत

ऑलिम्पिकसाठी भारताचा महिला हॉकी संघ जाहीर

बेंगळूर : टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी इंडियाने गुरुवारी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून 16 सदस्यीय संघातील आठ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

या संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे परिपूर्ण मिश्रण असून 2016 रिओ ऑलिमिपकमध्ये सहभागी झालेल्या आठजणींचाही त्यात समावेश आहे. या संघाचे कर्णधारपद स्टार स्ट्रायकर रानी रामपालकडे असून ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भाग घेणाऱया खेळाडूंत ड्रग फ्लिकर गुरजित कौर, उदिता, निशा, नेहा, नवनीत कौर, शर्मिला देवी, लालरेमसियामी, सलिमा टेटे यांचा समावेश आहे.

Advertisements

 यापैकी लालरेमसियामी ही ऑलिम्पिकमध्ये खेळणारी मिझोरमची पहिली खेळाडू आहे. सलिमा टेटेने 2018 युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते आणि त्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक मिळविले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या आठ अनुभवी खेळाडूंत कर्णधार रानी रामपाल, गोलरक्षक सविता, दीप ग्रेस एक्का, सुशीला चानू पुखराम्बम, मेनिका, निक्की प्रधान, नवज्योत कौर, वंदना कटारिया यांचा समावेश आहे. या आठ जणींनी मिळून आजवर एकूण 1492 सामने खेळले आहेत.

निवडलेल्या संघात सविता ही एकमेव गोलरक्षक असून, चार डिफेंडर्स, सहा मिडफिल्डर्स, पाच फॉरवर्ड्सचा त्यात समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही एकूण तिसरी व सलग दुसरी वेळ आहे. याआधी त्यांनी 1980 व 2016 मधील ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. 2016 रिओ ऑलिम्पिकनंतर भारतीय संघाने बरीच प्रगती केली असून त्याचवर्षी त्यांनी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी व 2017 आशिया चषक स्पर्धा जिंकली आणि 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. याशिवाय 2018 मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत नवा इतिहास घडविला होता. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निन्गोबम यांनी या संघाला  ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 36 वर्षांच्या खंडानंतर भारतीय महिलांनी प्रथमच 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली होती. सध्या येथील साई केंद्रावरील शिबिरात महिला संघ स्पर्धेसाठी सराव करीत आहे.

ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेला भारताचा महिला हॉकी संघ : गोलरक्षक-सविता. बचावफळी-दीप ग्रेस एक्का, निक्की प्रधान, गुरजित कौर, उदिता. मध्यफळी-निशा, नेहा, सुशीला चानू पी., मोनिका, नवज्योत कौर, सलिमा टेटे. आघाडी फळी-रानी रामपाल, नवनीत कौर, लालरेमसियामी, वंदना कटारिया, शर्मिला देवी.

Related Stories

एएफसीच्या कोरोना व्हायरस मोहिमेत भुतियाचा समावेश

tarunbharat

न्यूझीलंडच्या ऑलिंपिक पथकामध्ये तृतीयपंथीय ऍथलीट

Patil_p

जेसॉन होल्डरसाठी ‘टर्निंग पॉईंट’

Patil_p

सेरेना विल्यम्स, अझारेंका चौथ्या फेरीत

Patil_p

प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 27 सप्टेंबरपासून

Patil_p

टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून

Patil_p
error: Content is protected !!