तरुण भारत

महाराष्ट्रातील कोरोना : रुग्ण संख्येत पुन्हा काहीशी वाढ; 236 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. गुरुवारीही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली. बुधवारी 9,350 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर गुरुवारी राज्यात 9 हजार 830 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यासोबतच 5 हजार 890 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

Advertisements
  • सध्या राज्यातील मृत्यू दर 1.95 % 


दरम्यान, कालच्या दिवशी 236 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 1,16,026 जणांनी आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 56 लाख 85 हजार 636 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 95.64 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 39 हजार 960 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 88 लाख 57 हजार 644 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 44 हजार 710 (15.3%) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 50 हजार 663 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 4 हजार 964 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

  • मुंबई : 14,807 रुग्णांवर उपचार सुरू 


मुंबईत मागील 24 तासात 666 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 741 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,19,179 वर पोहचली असून त्यातील 6,8,866 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 734 दिवस इतका आहे. 

Related Stories

‘घर-घर राशन योजने’ला स्थगिती

Patil_p

कराडमध्ये वादळी वाऱयासह पावसाने भीतीचे वातावरण

Patil_p

कोल्हापुरी गुळाचे होणार आता`ब्रँडींग’

triratna

विमा कंपन्यांमध्ये खासगी भागीदारीचा मार्ग मोकळा

Patil_p

दिल्लीतील लसीकरणाचे संकट होणार कमी; केजरीवाल म्हणाले…

Rohan_P

इस्त्राईल, यूएई, बहारिनमध्ये ऐतिहासिक शांती करार

datta jadhav
error: Content is protected !!