तरुण भारत

उंटांवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, या मागणीसाठी दलित क्रांती सेना आणि घटप्रभा रमेश जारकीहोळी अभिमानी बळग या संघटनेतर्फे उंटांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

अश्लील सीडी प्रकरणानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी संपूर्ण चौकशीला सहकार्य केले आहे. ते आता निर्दोष असून त्यांना तातडीने मंत्रिमंडळात घ्यावे. कारण जिल्हय़ाचा विकास व्हायचा असेल तर रमेश जारकीहोळी यांना मंत्री करणे गरजेचे आहे. तातडीने त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

कित्तूर चन्नम्मा चौक येथून उंटांवरून बसून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पांढरा पोषाख आणि गांधी टोपी घालून मोजकेच कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देऊन रमेश जारकीहोळी यांना मंत्री करा, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दलित क्रांती सेनेचे राज्याध्यक्ष अशोककुमार असोदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

शिक्षेपेक्षाही स्वातंत्र्य अन् मातृभूमीचाच विचार!

Amit Kulkarni

लॉकडाऊनमुळे सण-उत्सव यंदाही साधेपणानेच

Patil_p

द वायरच्या संपादकांनी माफीनामा जाहीर करावा

Omkar B

पट्टणकुडीतील वृद्धाला लुटणाऱया जोडगोळीला अटक

Patil_p

भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ दर स्थिर

Patil_p

चन्नम्मा विद्यापीठाचा अजब कारभार

Amit Kulkarni
error: Content is protected !!