तरुण भारत

उद्यमबाग रस्त्यावर पावसाचे पाणी

वार्ताहर / किणये

बेळगाव-पणजी महामार्गावरील उद्यमबागनजीकच्या रस्त्यावर पावसाचे पाणी येऊ लागले आहे. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. चक्क महामार्गावरच पावसाचे पाणी येत असल्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रशासनामार्फत जोरदार कामकाज सुरू आहे. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील उद्यमबागनजीकच्या परिसरात थेट रस्त्यावरूनच पावसाचे पाणी वाहू लागल्यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागत आहे.

उत्सव हॉटेलनजीकच्या सर्कलपासून रस्त्यावरून थेट पाणी वाहू लागले आहे. एका चार चाकी शोरुमच्या बाजूलाच मुख्य महामार्गावर पाणी वाहताना दिसत आहे. मोठी वाहने जात असताना बाजूच्या दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर हे  पाणी उडत आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वार या ठिकाणाहून ये-जा करत असताना रस्त्याच्या पाण्यामुळे भिजून गेले आहेत.

पाण्याचा निचरा गटारीतून होण्याची गरज आहे. मात्र, पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे महामार्ग व गटारीचे कामकाज कशा पद्धतीने करण्यात आले आहे, याची उलटसुलट चर्चाही उद्यमबाग परिसरात होऊ लागली आहे.

Related Stories

शेतक-यांनी मोबाईल ऍपद्वारे पीकसर्व्हे करावा

Patil_p

जिल्हय़ात 188 कोरोना बाधित

Patil_p

धर्मनाथ चौकाला जोडणारे रस्ते समस्यांच्या गर्तेत

Patil_p

खासबाग येथे खुल्या जागेत अतिक्रमण

Omkar B

आईच्या महतीची ध्वनिफीत प्रकाशित

Patil_p

निपाणी पालिकेतर्फे विनामास्क कारवाईला गती

Omkar B
error: Content is protected !!