तरुण भारत

‘अपेक्स’चा डॉ. महेश जाधव याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी / मिरज

विनापरवाना कोविड सेंटर चालवून निष्पाप लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अपेक्स कोविड केअर सेंटरचा संचालक डॉ. महेश जाधव याला अखेर शुक्रवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुरूवारी सदोष मनूष्य वधाचा गुन्हा दाखल होताच अटकपूर्व जामीनासाठी त्याची धडपड सुरू होती. मात्र, शुक्रवारी सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन जामीन अर्ज फेटाळल्यानंतर डॉ. महेश जाधव याने पळ काढला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करुन कासेगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याला जेरबंद केले.

Advertisements

अपेक्स रुग्णालय प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. महेश जाधव हा पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. महेश जाधव याच्यावर गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्याची खबर लागताच डॉ. महेश जाधव याने पळ काढला. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करुन कासेगांव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात त्याला पकडून तेथेच बेड्या ठोकल्या. अपेक्स रुग्णालय प्रकरणी आणखी काही जणांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

Related Stories

सांगली : जातपंचायतीने वाळीत टाकल्याने जतमध्ये तरुणाचे आंदोलन

Abhijeet Shinde

म्हैसाळ योजनेचे आवर्तन दोन दिवसात सुरू होणार

Abhijeet Shinde

दिघंची सरपंच,उपसरपंच पतीसह चार कर्मचारी पॉझिटिव्ह,शहर बनले हॉटस्पॉट

Abhijeet Shinde

जमीन वादातून खूनप्रकरणी एकास जन्मठेप

Abhijeet Shinde

सांगली : मराठा समाजाचे आरक्षण महाविकास आघाडीच्या सरदारामुळेच गेले

Abhijeet Shinde

सांगली : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!