तरुण भारत

आमदार वैभव नाईक यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये!

सुनील घाडीगावकर, महेंद्र चव्हाण यांचा टोला

प्रतिनिधी / मालवण:

Advertisements

  हिवाळे हा परिसर खाणक्षेत्र आहे. या ठिकाणी मोठय़ाप्रमाणात दगड खाणी असल्याने मोठा महसूल शासनास मिळतो. त्यामुळेच जिल्हा खनिकर्म निधीतील रुग्णवाहिका प्राधान्याने हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली. मात्र, रुग्णवाहिका मिळाल्याचे फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहेत. असा प्रहार, पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर व जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी केला आहे.

 हिवाळे परिसरातील ग्रामस्थांनी खाणींसाठी जमिनी दिल्या. गौण खनिज उत्खननातून शासनाला मिळालेल्या महसुलातून अर्थात येथील जनतेच्या पैशातून रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यामुळे आमदार नाईक यांनी न केलेल्या कामांचे फुकाचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही सुनील घाडीगावकर यांनी लगावला. हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवारी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती तथा पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर, सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, सुशांत घाडीगांवकर, अरुण मेस्त्राr, विश्वास परब संजय गावडे, मदन गावडे, काका गावडे, प्रशांत गावडे, रामचंद्र पवार, बबन परब, उत्तम परब, महेश गावडे, जितेंद्र परब, दीपक परब, प्रकाश कासले, बाबी हिवाळेकर, संकेत चव्हाण, प्रकाश परब, रवी राणे, डॉ. साळकर व अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

कुडाळ नगराध्यक्षांचे आजपासून रत्नागिरीत बेमुदत उपोषण

NIKHIL_N

बावीस हजार वृक्ष निर्मितीचा संकल्प

NIKHIL_N

पालकमंत्र्यांनी घडविला समन्वय

NIKHIL_N

मालवण – बेळगाव बसफेरी सोमवार पासून

Rohan_P

सांखळी मतदारसंघात पावसामुळे पडझड सुरूच

Patil_p

रेल्वे प्रवासात रोख रक्कमेसह दागिने लांबवले

Patil_p
error: Content is protected !!