तरुण भारत

सुमिता मित्रांना युरोपियन पुरस्कार

दंतवैद्यक शास्त्रात (डेंटिस्ट्री) नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे कल्पक तंत्रज्ञान शोधून काढल्यामुळे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या संशोधिका सुमिता मित्रा यांना युरोपियन इन्व्हेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दंतवैद्यक शास्त्रात या तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे त्यांनी केलेले संशोधक हे पायाभूत मानले जात आहे.

हा पुरस्कार त्यांना युरोपियन महासंघाच्या बाहेरच्या देशांसाठी असणाऱया श्रेणीत प्राप्त झाला आहे. नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग दातांवरच्या शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यामध्ये अतिशय सुलभपणे आणि वेदनारहित पद्धतीने करता येतो, हे प्राथमिक प्रयोगांवरून दिसून आल्यानंतर त्यांनी या विषयावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या संशोधनामुळे आता वेदना न होता दात काढणे किंवा नवा बसविणे शक्य होणार आहे. त्यामुळे दात किंवा दाढा काढून घेताना रुग्णाला भीती वाटण्याचे कारण राहणार नाही. तसेच कमीतकमी रक्तस्त्राव दातांच्या शस्त्रकिया करताना होऊ शकते. तसेच शस्त्रक्रियेनंतर जखमा भरून निघण्यासाही कमी वेळ लागेल, असे या संशोधनाचे वैशिष्टय़ असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

Advertisements

नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी असा पदार्थ शोधून काढला आहे की. तो कृत्रित दात तयार करण्यासाठी किंवा पोकळ दाढा भरण्यासाठी सध्याच्या पदार्थांपेक्षा जास्त उपयुक्त आहे. हा पदार्थ अतिशय घट्ट असल्याने कृत्रिम दातांनीही आपल्याला खऱया दातांसारखेच चावता येणार आहे. या पदार्थापासून केलेले कृत्रिम दात खऱया दातांसारखेच दिसणार असून त्यांची चमक कित्येक वर्षांनंतरही कमी होणार नाही किंवा त्यांची झीजही अत्यल्प होईल. अशा पदार्थाची डेंटिस्टस्ना बऱयाच दशकांपासून प्रतीक्षा होती. आता ती संपली आहे.

Related Stories

फ्रान्सच्या पंतप्रधानांचा ‘कोरोना’मुळे राजीनामा

Patil_p

ब्रिटन चीनच्या ‘हुआवेई’ला 5G नेटवर्कमधून हटवणार

datta jadhav

फिलिपिन्स हवाई दलाचे विमान दुर्घटनाग्रस्त; 40 जणांना वाचवण्यात यश

datta jadhav

नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा ओली

Patil_p

जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत ऍड. युवराज नरवणकर

triratna

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य : WHO

datta jadhav
error: Content is protected !!