तरुण भारत

नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समिती आक्रमक

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेली बारा वर्षे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱया सेट, नेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 21 जून पासून पुण्यात सत्याग्रह सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरही राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर करून आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी संघर्ष समितीच्या जिल्हातर्गंत राज्य समन्वयक डॉ.मनीषा आझाद नायकवडी, डॉ. रजनी कारदगे, प्रा. किरण पाटील, प्रा.अक्षय माने, प्रा. शंकर शिंदे, प्रा.चेतन पाटील प्रा. अनिता पोवार, प्रा.ऋषिकेश पाटील, प्रा. राजश्री मालेकर आदी उपस्थित होते.

संघर्ष समितीने केलेल्या मागण्या अशा :

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय आणि विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांची शंभर टक्के पदे भरण्यात यावीत.
    -अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती सुरळीत होण्यासाठी याआधीचा 3 नोव्हेंबर 2018 चा शासन आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा. नव्याने तांत्रिकदृष्टय़ा अडचणी नसणारा सर्वसमावेशक सर्वांना न्याय देणारा शासन आदेश काढण्यात यावा.
    -प्रचलित तासिका तत्व धोरण बंद करावे. तसेच शंभर टक्के पदभरती होईपर्यंत समान काम समान वेतन या तत्वानुसार सेवाशर्तीनुसार वेतन देण्यात यावे.
    -विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार परिपत्रक दि. 7 व 8 मार्च 2019 नुसार आरक्षणासाठी विभाग व विषय एकक न मानता विद्यापीठ व महाविद्यालय एकक मानून सहाय्यक प्राध्यापक भरती करावी.

सत्याग्रहानंतर अन्नत्याग करणार

मागणीच्या संदर्भाने 21 जून पासून पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोरसत्याग्रह आंदोलन करणार आहोत आा†ण या मागण्यांना लवकर प्रतिसाद दिला नाही तर महाराष्ट्रव्यापी अˆत्याग आंदोलन तत्काळ सुरु करणार असल्याचा इशारा राज्य समन्वयक डॉ.परमेश्वर पौळ, प्रा.सुरेश देवढे पाटील, प्रा.प्रमोद तांबे, प्रा.प्रवीण शिंदे पाटील,डॉ.मनीषा आझाद नायकवडी यांनी दिला आहे.

Advertisements

Related Stories

म्हासुर्ली आरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट असल्याचे स्पष्ट

Abhijeet Shinde

पोलिसांची रात्रगस्त झाली हायटेक…

Abhijeet Shinde

कोरोना विरोधातील योद्धय़ांसाठी विमा कवच

Abhijeet Shinde

हुपरी पोलिसांचा महाराष्ट्रात आदर्श उपक्रम – आ. राजू बाबा आवळे

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अतिरिक्त कपातीमुळे शेतकरी हैराण

Abhijeet Shinde

आजऱ्याजवळ अपघातात जळगाव येथील एक ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!