तरुण भारत

कोरोना काळातही मोदी लोकप्रियतेत ‘टॉपर’

गेल्या वर्षभरात रेटिंग घसरले – मात्र अव्वल स्थान कायम, बायडेन सहाव्या स्थानी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातही आपला डंका सिद्ध केला आहे. त्यांची लोकप्रियता कायम असून ते जगातील अव्वल नेते असल्याचा निष्कर्ष ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकन डाटा इंटेलिजन्स कंपनीने काढला आहे. मोदींच्या गुणांकनात पूर्वीपेक्षा आता घसरण झाली असली तरी जगातील इतर बडय़ा नेत्यांच्या तुलनेत त्यांची आघाडी आजही कायम टिकून आहे. पंतप्रधान मोदींचे ग्लोबल ऍप्रूव्हल रेटिंग 66 टक्के इतके असून त्यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आदी बडय़ा देशांच्या नेत्यांना पिछाडीवर टाकले आहे.

‘मॉर्निंग कन्सल्ट’ या संस्थेने जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रियता पुन्हा अव्वल ठरली आहे. सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान त्यांचे ऍप्रूव्हल रेटिंग घसरले आहे. तथापि, आघाडीचे स्थान मात्र कायम टिकून आहे. या सर्वेक्षणासाठी भारतातील 2,126 लोकांची मते आजमावण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ऍप्रूव्हल रेटिंगनुसार, मोदींपाठोपाठ इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रगी यांचा 65 टक्केंसह दुसरा तर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर 63 टक्के गुणांसह तिसऱया स्थानी आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे सध्या 53 टक्केंसह सहाव्या स्थानी आहेत. बायडेन यांच्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (54 टक्के) आणि जर्मनीच्या चॅन्सेलर एंजेला मर्केल (53 टक्के) यांनी आघाडी घेत अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (48 टक्के), ब्रिटनचे पंतप्रधान (44 टक्के), दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेईन (37 टक्के), स्पेनचे पेट्रो सांचेज (36 टक्के), ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअर मॅक्रॉन (35 टक्के) आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (29 टक्के) अशी पुढील क्रमावारीही ‘मॉर्निंग कन्सल्ट’कडून जाहीर करण्यात आली आहे.

Related Stories

दमणमध्ये आता कोरोनाचा शिरकाव

pradnya p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 5,371 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

तुरूंगात अडकलेल्या भारतीयांसाठी धावला ‘भला माणूस’

Patil_p

शिवराज मंत्रिमंडळात ‘सिंधिया’ वरचढ

Patil_p

ब्रू शरणार्थींच्या पुनर्वसनाच्या विरोधात निदर्शने

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती भवनात दाखल

tarunbharat
error: Content is protected !!