तरुण भारत

संभाव्य पूरस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची आज जिल्हाधिकाऱयांशी चर्चा

महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री, अधिकाऱयांचीही बेंगळुरात होणार बैठक

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

उत्तर कर्नाटकातही मागील चार दिवसांपासून संततधार सुरूच असून नद्यांची पाणीपातळी वाढल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पाऊस आणि पूरस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकाऱयांची बैठक बोलावली आहे. यावेळी पूरस्थितीमुळे उद्भवणाऱया संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनांना सूचना देणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील आणि अधिकारी देखील संभाव्य पूरस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बेंगळुरात दाखल झाले आहेत. त्यांच्याशीही शनिवारी चर्चा होणार आहे.

शनिवारी विशेषतः बेळगाव जिल्हय़ातील परिस्थितीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील आणि तेथील अधिकाऱयांसमवेत बेंगळूरात बैठक होईल. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून पूरस्थिती नियंत्रणासंबंधी यावेळी चर्चा करण्यात येणार आहे.

बेळगाव जिल्हय़ातील परिस्थितीविषयी प्राधान्याने चर्चा

बेळगाव जिल्हय़ातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली असून प्रामुख्याने चिकोडी, हुक्केरी, गोकाक, रामदुर्ग, अथणी या भागात नद्यांची पातळी वाढली आहे. त्यामुळे या भागात खबरदारीच्या उपाययोजना, पूरस्थिती हाताळण्यासंबंधी महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाला देण्याची शक्यता आहे. तसेच पूरस्थितीतील बचावकार्यासंबंधी केलेल्या पूर्वतयारीची माहितीही ते यावेळी घेणार असल्याचे समजते.

पाटबंधारे खात्यातील अधिकाऱयांची पूर्वतयारी बैठक

पावसामुळे उद्भवणारी संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी शनिवारी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी राज्य पाटबंधारे खात्याचे अप्पर मुख्य सचिव राकेश सिंग यांच्या नेतृत्वखाली पूर्वतयारी बैठक पार पडली.

उत्तर कर्नाटकातील कृष्णा आणि भीमा या प्रमुख नद्यांच्या खोऱयातील पूरस्थिती नियंत्रण आणि उपाययोजनेविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी राज्य आपत्ती नियंत्रण समितीचे प्रमुख मंजुनाथ प्रसाद, आंतरराज्य जलविवादसंबंधीचे प्रमुख सल्लागार अनिलकुमार, पाटबंधारे खात्याचे सचिव लक्ष्मणराव पेशवे, कर्नाटक पाणीपुरवठा निगमचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन गुंगे आदी उपस्थित होते.

Related Stories

हुंडय़ाविरोधात केरळमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने

Patil_p

भारतीय जवानांना ‘ते’ ॲप्स तत्काळ डिलीट करण्याचे सैन्याचे आदेश

pradnya p

बडगाममध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश

datta jadhav

कोरोना चाचणीचा वेग 90 हजारावर

Patil_p

चीनमध्ये कोरोना नियंत्रणात

tarunbharat

राजकीय पॉलिटेक्निकमध्ये परीक्षेविना प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!