तरुण भारत

भारताच्या टोकियो ऑलिम्पिक पथकाचे ‘जेएसडब्ल्यू’ नवे पुरस्कर्ते

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय पथकाला जेएसडब्ल्यू ग्रुप हे नवे पुरस्कर्ते लाभले असल्याची माहिती शुक्रवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.

Advertisements

भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि जेएसडब्ल्यू उद्योग समुहामध्ये झालेल्या पुरस्कर्त्याच्या करारानुसार जेएसडब्ल्यू उद्योग समुहाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला एक कोटी रुपयांची रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय क्रीडा पथकासाठी इच्छुक पुरस्कर्त्याना अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 17 जून देण्यात आली होती. आता टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱया भारतीय क्रीडा पथकाचे प्रमुख पुरस्कर्ते म्हणून जेएसडब्ल्यू उद्योग समूह यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आयओएचे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि जेएसडब्ल्यू उद्योग समुहाचे सीईओ पार्थ जिंदाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जेएसडब्ल्यू उद्योग समुहाकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला 1 कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल. इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया बेंगळूर एफसी संघाचे जेएसडब्ल्यू हे मालक आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यापूर्वीच अमुल या उद्योग समुहाशी पुरस्कर्ता करार केला आहे. त्याचप्रमाणे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱया भारतीय पथकाचे एमपीएल स्पोर्ट्स फौंडेशन हे प्रमुख पुरस्कर्ते आहेत. आता भारतीय ऑलिम्पिक पथकाला एकूण 3 पुरस्कर्ते लाभले आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एमपीएल बरोबर दीड वर्षासाठी करार केला असून या करारानुसार एमपीएल 8 कोटी रुपये भारतीय ऑलिम्पिक संघटनेला देणार आहे.

Related Stories

रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याखाली सापडला युवतीचा मृतदेह

Patil_p

लंकेचा धमिका प्रसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

चार्लस्टन स्पर्धेत किनेन, अँड्रेस्क्यूचा सहभाग

Patil_p

टी-20 वर्ल्ड कपसाठी पुढील आठवडय़ात संघनिवड

Patil_p

स्मृती मानधनाचे पहिले कसोटी शतक

Patil_p

अविश्का गुणवर्धने अफगाण संघाचा फलंदाज प्रशिक्षक

Patil_p
error: Content is protected !!