तरुण भारत

स्पेन संघात बुस्केटचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ माद्रिद

स्पेन फुटबॉल संघाचा कर्णधार सर्जिओ बुस्केटला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. बुस्केटवर तातडीने वैद्यकीय इलाज करण्यात आला. आता तो कोरोना व्याधीतून पूर्णपणे बरा झाला आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्पेनच्या फुटबॉल संघात बुस्केटचे पुनरागमन झाले आहे.

Advertisements

युरो चषक स्पर्धेसाठी माद्रिदमध्ये स्पेन संघाचे सराव शिबिर सुरू असताना कर्णधार बुस्केटला कोरोनाची बाधा झाली होती. 6 जून रोजी कोरोना चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला बार्सिलोनाला त्याच्या निवासस्थानी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीत तो निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी स्पेनचा सामना पोलंड बरोबर होणार आहे. या सामन्यासाठी बुस्केटने आपल्या संघासमवेत सेव्हेलिला प्रयाण केले. 2010 साली झालेल्या फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱया स्पेन संघामध्ये बुस्केटचा समावेश होता. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्पेनचा इ गटातील स्वीडनबरोबरचा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता.

Related Stories

दुसऱया कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश

Patil_p

पाकचा द.आफ्रिकेवर 7 गडय़ांनी विजय

Patil_p

टी-20 विश्वचषकाबाबत निर्णय लवकरच

Patil_p

प्रशिक्षक निवड प्रक्रिया लवकरच

Patil_p

आक्रमक फलंदाजी हाच योग्य पर्याय होता

Patil_p

भारतीय खेळाडूंना वर्ल्ड ऍथलेटिक्स रिले स्पर्धा हुकणार

Patil_p
error: Content is protected !!