तरुण भारत

शफालीचे दुसऱया डावातही अर्धशतक

वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल

इंग्लंड महिला संघाविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या तिसऱया दिवशी चहापानापर्यंत भारताने फॉलोऑननंतर दुसऱया डावात 24.3 षटकांत 1 बाद 83 जमविल्या असून ते अद्याप 82 धावांनी मागे आहेत. भारताची 17 वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने निवडक महिला फलंदाजांच्या यादीत स्थान मिळविताना दोन्ही डावात अर्धशतके नोंदवणारी चौथी महिला फलंदाज होण्याचा मान मिळविला आहे. चहापानास खेळ थांबला तेव्हा शफाली 68 चेंडूत 11 चौकारांसह 55 धावांवर खेळत होती तर दीप्ती शर्मा 18 धावांवर तिला साथ देत होती.

Advertisements

या सामन्यात इंग्लंडने 9 बाद 396 धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर  दमदार शतकी सलामीनंतरही भारताचा पहिला डाव 231 धावांत आटोपला. 5 बाद 187  या धावसंख्येवरून भारताने तिसऱया दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आणि एक्लेस्टोनच्या भेदक माऱयासमोर 81.2 षटकांत भारताचा पहिला डाव 231 धावा संपुष्टात आला. शफाली वर्मा व स्मृती मानधना तसेच दीप्ती शर्मा (नाबाद 29) व पूजा वस्त्रकार (12) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. दीप्ती-पूजा यांनी नवव्या गडय़ासाठी 33 धावांची भागीदारी केली तरी भारताला फॉलोऑन टाळता आला नाही. सोफी एक्लेस्टोनने 88 धावांत 4 बळी मिळविले तर हीदर नाईटने 2 व क्रॉस, स्किव्हर, श्रबसोल, बंट यांनी एकेक बळी मिळविले. इंग्लंडला पहिल्या डावात 165 धावांची आघाडी मिळाल्याने त्यांनी भारताला फॉलोऑन दिला.

फॉलोऑननंतर दुसऱया डावात भारताची खराब सुरुवात झाली. उपाहाराच्या ठोक्यालाच स्मृती 8 धावांवर बाद झाली. उपाहारानंतरच्या सत्रात शफालीने दीप्तीच्या साथीने आक्रमक खेळ करीत 63 चेंडूत अर्धशतक नोंदवले. पदार्पणाच्या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतके झळकवणारी ती चौथी महिला फलंदाज बनली आहे. या सत्रात पावसाचा पुन्हा व्यत्यय आल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेतला गेला.

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड महिला प.डाव 9 बाद 396 डाव घोषित, भारत महिला प.डाव सर्व बाद 231 ः शफाली वर्मा 96, स्मृती मानधना 78, दीप्ती शर्मा नाबाद 29, पूजा 12, एक्लेस्टोन 4-88, नाईट 2-7), फॉलोऑननंतर भारत दु.डाव (चहापानापर्यंत) 24.3 षटकांत 1 बाद 83 ः शफाली वर्मा खेळत आहे 55, दीप्ती शर्मा खेळत आहे 18, ब्रंट 1-21.

Related Stories

अँडरसनचे 5 बळी, सिबलीचे नाबाद अर्धशतक,

Patil_p

आशिया चषक फुटबॉल स्पर्धा चीनमध्ये

Patil_p

आघाडीच्या स्थानासाठी आज चेन्नई-दिल्ली लढत

Patil_p

शिवा थापाची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p

अंकिता रैना अंतिम फेरीत

Patil_p

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

Patil_p
error: Content is protected !!