तरुण भारत

उद्रेक झाल्यास राज्यकर्तेच जबाबदार

प्रतिनिधी/ सातारा

लोकशाहीचे तुम्ही राजे आहात. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलात हे कदापि विसरु नका. माझ्यासह हे सर्वांना लागू होतं. त्यामुळे वारंवार मागणी करुन सुद्धा अधिवेशन बोलवलं जात नाही. श्वेतपत्रिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे कुठंतरी पाणी मुरतंय असंच म्हणावं लागेल आणि तसं नसेल तर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या. नाहीतर उद्रेक झाला तर तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार असाल, असा गंभीर इशारा खासदार उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना दिला.

Advertisements

साताऱयात आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले,  दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चिघळत आहे. अत्यंत गांभीर्याने महाराष्ट्र शासनाने याकडे बघायला हवं होतं. पण तसं पहायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येकवेळी स्वतःची जबाबदारी दुसऱयावर झिडकारुन टाकणे हे योग्य नाही. आज राज्यकर्ते म्हणून तिथे राज्यकारभार पहाताना प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग मराठा समाजाचे आमदार असतील ते आणि जे इतर आहेत ते. या सगळय़ांची संयुक्तिक अशी जबाबदारी आहे. आम्ही कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले होते. त्या संदर्भात मला थोडसं बोलावसं वाटतं. पाच सहा मुद्यांचा आम्ही उल्लेख केला होता. पहिल्या प्रथम म्हणजे सारथी संस्था जी आहे तिला किमान एक हजार कोटी रुपये देण्यात यावेत. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास दोन हजार कोटींची तरतूद करण्यात यावी. त्यानंतर राज्यातल्या प्रत्येक जिह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यात यावेत. सुपर न्युम्रररी पोस्ट निर्माण कराव्यात. राजर्षी शाहु महाराजांची जी योजना आहे ती या अगोदर अस्तित्वात होती ती पुन्हा लागू करण्यात यावी. या संपूर्ण विषयांवर बऱयाच वेळा चर्चा झाल्या. त्यातून काहीच हाती लागलं नाही.

आज मराठा समाजामध्ये फार मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. या सगळय़ाला जबाबदार आमदार, खासदार हे सगळे राज्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रत्येकाने थोडासा विचार करण्याची गरज आहे. राजकारण तुम्ही जरुर करा. आपाआपल्या परीने जे कोण कुठल्या पक्षातील असतील ते पक्षवाढीसाठी प्रयत्न जरुर करावेत. पण तेढ निर्माण झाल्यामुळे माणसांमध्ये माणुस राहिला नाही. लहानपणाचे मित्र केवळ या जातीच्या मुद्यावरती आज एकमेकाशी बोलायला तयार नाहीत. मी नेहमी सांगत असतो याच्यातून काय निष्प्पन्न होणार आहे. एकतर मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता, जी स्वराज्याची संकल्पना होती, ती तर लांबच राहिली. त्यांचे नाव घेत असताना त्यांचे विचारही आचरणात आणलेले पहायला मिळाले पाहिजेत.  

…तर देशाचे तुकडे झालेले पहायला मिळतीय

आपण देशभरात, जगभरात सगळीकडे सांगतो की भारत ही सगळय़ात मोठी लोकशाही आहे आणि असे जर चालत राहिले तर उद्या तुम्ही आम्ही असो नसो पण कालातंराने काळ तुम्हाला माफ करणार नाही. कारण या देशाचे याच मुद्यावरती तुकडे झालेले पहायला मिळतील. आणि जो देश आपण अभिमानाने सांगतो हा भारत देश सगळयांत मोठी लोकशाही आहे. हे सुरेख चित्र फार काळ टिकणार नाही. जसे रशियाचे टुकडे झाले त्याचप्रकारे भारताचीही तशीच अवस्था होणार.

नेमकं कोण खोडसाळपणा करतंय हे जनतेला कळू द्या

माझी हात जोडून विनंती आहे, या सर्व राज्यकर्त्यांना तुम्ही सर्व कुठल्याही जातीतले असला तरी तुम्ही महान आहात. तुम्हाला लोकांनी निवडून दिले. लोकशाहीतले तुम्ही राजे आहात. आज तुमच्या हातात धुरा दिली आहे. ती धुरा तुमच्या हातात दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असतात की त्याला कुठेतरी तडा जाता कामा नये. हे प्रत्येकाने पाळले पाहिजे. जर उद्रेक झाला तर फक्त आणि फक्त राज्यकर्तेच असतील वारंवार आमची मागणी आहे. नेमकं कोण खोडसळपणा करतंय लोकांसमोर आलं पाहिजे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. त्याचा लाईव्ह टेलिकास्ट लोकांना झाला पाहिजे. बंद कॅमेऱयात घडतं एक आणि बाहेर आल्यावर सांगितले जाते दुसरेच. लोकांचा अधिकार आहे लोकशाहीचे तुम्ही राजे आहात लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलात. हे कदापि विसरु नका. हे इतरांच्या बरोबरीने मला सुद्धा लागू होतं.

वारंवार मागणी करुनसुद्धा आज अधिवेशन बोलवलं जात नाही. श्वेतपत्रिका जाहीर केली नाही. अजूनपर्यंत कुठंतरी कायतरी पाणी मुरतंय असचं म्हणावं लागलं. आणि नसेल तर घ्या पाच तारखेला अधिवेशन आहे त्यांच्या आधी स्पेशल अधिवेशन ह्याच्या मुद्यावर दोन दिवसांचे बोलवा. जर महाराष्ट्राची अखंडता पहायची असेल, ह्याच्यात फुट पडलेली कोणाला पहायची नसेल तर हे गरजेचे आहे, अशी महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेच्यावतीने माझी विनंती आहे. नाहीतर जे काय परिणाम होतील त्याला तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना दिला.

Related Stories

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको : दलित महासंघाचा पाठिंबा

Abhijeet Shinde

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 हजार 500 कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण

Patil_p

सोलापूर शहरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Abhijeet Shinde

मोडलेले लग्न जमवले पोलिसांनी

tarunbharat

पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Patil_p

मराठा आरक्षणाला माओवाद्यांचा पाठिंबा म्हणजे महाविकास आघाडीला धोक्याची घंटा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!