तरुण भारत

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. फ्लाईंग सिख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात देखील केली आणि त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र घरी आल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजता निधन झाल्याची बातमी आली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल मिल्खा यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते.

Advertisements


राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंग यांनी जिंकून दिले होते. भारताचा पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता. मिल्खा सिंग यांनी त्या काळी जे यश मिळवले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आतापर्यंत बरीच सुवर्णपदके त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावली होती. 1958 साली झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर 1960 साली झाली झालेली रोमममधील ऑलिम्पिक स्पर्धा मिल्खा सिंग यांनी चांगलीच गाजवली होती.

  • पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त 


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खा सिंग यांनी आपल्या देदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आपली कल्पनाशक्ती बदलली होती. त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे.


मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर जगभरातील क्रीडाप्रेमी, समाजातील अनेक मान्यवरांना त्यांना समाजमध्यामाद्वारे शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे. 

Related Stories

पश्चिम बंगालसाठी भाजपची नवी सूची घोषित

Patil_p

कोरोनाला रोखण्यासाठी ‘अश्वगंधा’ प्रभावी

Patil_p

देशात 1,00,636 नवे बाधित

datta jadhav

अखिलेश यादव यांच्या विधानाने संताप

Patil_p

69 हजार शिक्षक भरती प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

pradnya p

एकनाथ खडसेंच्या जावयाच्या ईडी कोठडीत वाढ; चौकशी सुरुच

Shankar_P
error: Content is protected !!