तरुण भारत

आत्मनिर्भर भारताची कोरोनाची लस घेत महामारीला हरविण्याची क्रांती घडवा

क्रांतीदिन सोहळय़ात मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

संपुर्ण जगावर कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले आहे. या महामारीविरोधात  लढताना ज्याप्रमाणे 75 वर्षापुर्वी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीजाविरोधात क्रांती घडवली. त्याप्रमाणे यंदा गोवा मुक्तीचा हिरकमहोत्सव व क्रांतीदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात मार्गक्रमण करताना कोरोना महामारीला तोंड देताना प्रत्येकाने आत्मनिर्भर भारताने बनविलेली लस घेत क्रांती घडवा असे आवाहन कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा येथील क्रांतीदिन सोहळय़ात काढले. 

फोंडा येथील क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकावर मंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवरांच्याहस्ते पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, रितेश नाईक,  6 टीटीआर लष्कर दलाचे कर्नल मानवेंद्र नगाईच, अतिरिक्त जिल्हाधिकारी गौरेश कुट्ठीकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व अन्य सरकारी अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

आजच्या युवकांनी अडी अडचणीच्या संकटकाळी खचून न जाता त्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यावे. वैचारीक दृष्टीकोन सकारात्मक ठेवून मार्गक्रमण केल्यास यश हे हमखास तुमचेच असेल. कोरोना महामारीचे युद्ध जिंकण्यासाठी मार्गदर्शक तत्वाचे पालन अत्यावश्यक असल्य़ाचे मंत्री गोविंद गावडे यांनी पुढे बोलताना म्हणाले.  हुतात्म्यांना आदरांजली दिल्यानंतर फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नितेश काणकोणकर यांच्या पथकाकडून मंत्री गोविंद गावडे यांनी मानवंदना स्वीकारली. त्यानंतर शारीरीक शिक्षकांतर्फे देशभक्तीपर गीताने सोहळय़ाची सांगता करण्यात आली.

Related Stories

पार्वतीनगर कुळण येथील महिलेच्या अपहरणाची तक्रार

Patil_p

तुमचा फोन खाली ठेवा आणि डिजिटल मुक्ती मिळवा : दिग्दर्शक जेन्स म्युरर

Shankar_P

कोरोनाचे रविवारी पाच बळी

Omkar B

साहित्यातून लोकमन जागृत करता येते

Patil_p

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करणे अशक्य

Amit Kulkarni

शॅडो कौन्सिल राबविणार संपर्कविरहीत प्रचार मोहीम

Amit Kulkarni
error: Content is protected !!