तरुण भारत

खरीप हंगामासाठी सांगेचे विभागीय कृषी कार्यालय सज्ज

कोरोनामुळे गावात जाऊन शेतकऱयांना भाज्यांच्या बियाणांचे वाटप, गतवर्षी फलोत्पादन महामंडळाच्या खरेदी केंद्रावर 148 टन भाज्यांची विक्री

प्रतिनिधी /सांगे

Advertisements

यंदाच्या खरीप हंगामासाठी सांगेचे विभागीय कृषी कार्यालय सज्ज झाले असून कोरोना महामारीच्या काळातही शेतकऱयांसाठी वावरत आहे. मुळात सांगे तालुका भाजीपाला उत्पादनात व्यापारी तत्त्वावर नव्हता. तेथे शेतकऱयांना प्रोत्साहित केले गेले आणि गतवषी फलोत्पादन महामंडळाच्या खरेदी केंद्रावर सांगे विभागातील शेतकऱयांनी भाजीविक्री केल्याचा आकडा 148 टन इतका आहे. याशिवाय शेतकऱयांनी जी भाजी खुल्या बाजारात विकली तिचा आकडा वेगळा आहे. यंदा खरीप हंगामात भाज्यांची बियाणे प्रत्यक्ष स्थळी जाऊन शेतकऱयांना वाटण्यात आलेली आहेत.

रब्बी हंगामात भाजीपाल्यामध्ये काकडीचे उत्तम पीक आले असून 60 टन काकडीचे पीक घेतले गेले, तर टोमॅटोचे 2 टन पीक व 21 टन हिरव्या मिरचीचे पीक घेतल्याची माहिती मिळाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. यंदा काराती, भेंडी, वाल, दुधी भोपळा, वांगी आदी भाज्यांची बियाणे वितरित केली आहेत. सांगे विभागातून मोठय़ा प्रमाणात भाज्यांचे उत्पादन होत असून स्वयंसाहाय्य गट तसेच स्वतंत्ररीत्या शेतकऱयांचा त्यात सहभाग असल्याचे सांगेच्या विभागीय कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी सांगितले. यंदा कोरोनाची शेतकऱयांमध्ये जबरदस्त भीती आहे. शेतकरी घराबाहेर पडत नाहीत. म्हणून कृषी अधिकाऱयांनी गावात जाऊन बियाणे वाटप केलेले आहे.

भाजीपाला उत्पादनात वाढ

भाजीपाला लागवडीत नफ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातच भाजी खरेदी करण्यासाठी सांगे विभागात दोन केंदे आहेत. सांगे विभागातील भाटी, वाडे कुर्डी, नेत्रावळी, रिवण ग्रामपंचायत क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. अनेक युवा शेतकरी भाजीपाला लागवडीत पुढे आले आहेत. बरेच शेतकरी व्यवसायिक तत्त्वावर भाज्यांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. यापूर्वी म्हणजे 2018-19 साली 48 टन भाजी फलोत्पादन महामंडळाने खरेदी केली होती. ती 2019-20 साली 90 टनांवर गेली. 

रागी हे आपले पारंपरिक पीक आहे, परंतु हळूहळू त्याची लागवड घटत गेली.   पौष्टिक अशी ही पिके नामशेष होऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर सांगेतील कृषी विभागाकडून यंदा खरीप हंगामात रागीचे पीक घेण्यास शेतकऱयांना प्रोत्साहित केले जाणार आहे. अशा पिकांना पुनरुज्जीवित करण्याचा हा एक भाग आहे. सध्या या पिकासाठी सब्सिडी देण्याची कृषी खात्याची योजना नाही. गेल्या वषी आत्माच्या अंतर्गत प्रात्यक्षिक म्हणून जी पिके घेण्यात आली होती आणि उत्तम प्रकारे उत्पादन आले होते त्यांची यंदा खरीपात लागवड करण्यात येणार असल्याची माहिती प्रभुदेसाई  यांनी दिली आहे.

विभागीय पातळीवर बियाणे तयार करणार

पावसाळय़ात डोंगराळ भागात भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. गावठी काकडी, चिबूड, भेंडी, दोडकी व विविध पालेभाज्यांचा त्यात समावेश असतो. या भागात उत्पादित होणारा भाजीपाला, जमिनीच्या खालील पिके उदारणार्थ अळूची माडी, काटेकणगा, कारांदे, झाडकणगा इत्यादींची स्थानिक बाजारपेठेत विक्री करून त्यातून किमान एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यंदा शेतकऱयांनी स्वतः तयार केलेल्या सुमारे 10 किलो लाल भाजीच्या बियाणांचे वाटप केले गेले आहे. यंदा वाल, 7 शिरांचे गावठी भेंडे, दुधी भोपळा, कोकणदुधी आदी भाज्यांची बियाणे विभागीय पातळीवर तयार करण्यासाठी बियाणांची नर्सरी तयार केली जाणार आहे. कोरोनामुळे संचारबंदी असो किंवा लॉकडाऊन, शेतीची कामे मात्र चालूच राहणार हे सांगेतील शेतकऱयांनी दाखवून दिले आहे.

Related Stories

भारतीयांना मायभूमीत आणण्याच्या निर्णयाचे सावईकर यांच्याकडून स्वागत

tarunbharat

निवडणूक आयुक्त गर्ग यांचा राजीनामा

Amit Kulkarni

फातोडर्य़ात आज होणार बेंगलोरची लढत एटीके मोहन बागानशी

Amit Kulkarni

युवा भंडारी समितीचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

भाजप सरकारने गोव्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली

Amit Kulkarni

केरी तपासणी नाक्मयावर अडीच हजार जणांची तपासणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!