तरुण भारत

विजयनगर-हिंडलगा येथे पिण्याच्या पाण्यात अळय़ा

शुद्ध पाणी पुरविण्याची ग्रा. पं. अध्यक्षांकडे मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

हिंडलगा-विजयनगर, चौथा क्रॉस येथील भंगीबोळ परिसरात पिण्याच्या पाण्यात अळय़ा आढळून येत आहेत. मागील काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र याकडे पाणीपुरवठा विभाग लक्ष देत नसून तातडीने आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. यासंबंधी परिसरातील नागरिकांनी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांना निवेदन दिले आहे. विजयनगर येथील नागरिकांना मागील काही दिवसांपासून अळय़ायुक्त पाणी पुरवठा केले जात आहे. अशा पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात येणार आहे. आधीच कोरोनामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता अशुद्ध पाणी पुरवठय़ामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नागेश माने, एम. वाय. पाटील, रुपा केसरकर, पुष्पा लोहार, मंगल भोसले, भैरू केसरकर यांच्यासह इतर नागरिक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

Related Stories

जमखंडीजवळ दुतोंडी साप विकणाऱ्या तरुणाला अटक

Rohan_P

विमल फौंडेशनचा वर्धापन दिन साजरा

Patil_p

बेळगावच्या सुपुत्राची कॅप्टनपदी निवड

Patil_p

हिरेबागेवाडी येथील तरुणाला कोरोना

Rohan_P

कुमारस्वामी लेआऊटमध्ये कोविड केअर सेंटर

Patil_p

एज्युकेशन इंडिया संस्थेतर्फे आहार किट वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!