तरुण भारत

अखेर उंट परतले आपल्या गावी

प्रशासनाने निर्दयीपणे भरपावसात काढले शहराबाहेर : प्राणीप्रेमींमुळे उंटांच्या परतीचा प्रवास झाला सुखकर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

रात्री 12 च्या सुमारास निर्दयी प्रशासनाने धो-धो पावसात उंटांना बाहेर काढले. शहर सोडून निघून जाण्यास पोलिसांनी भाग पाडल्याने पावसामध्ये त्यांनी खुल्या मैदानावर जाण्याचा निर्णय घेतला. मुक्मया जनावरांसोबत त्यांच्या मालकांनी संपूर्ण रात्र धुवाधार पावसात कुडकुडत काढली. अखेर ती त्यांची अवस्था पाहून प्राणीमित्रांनी त्यांना पुन्हा ब्रिजखाली नेवून सोडले. त्यानंतर माझा धर्म पशु बचाव संघटनेचे पदाधिकारी व इतर प्राणीमित्रांच्या मदतीने अखेर ते उंट खासगी वाहनाने पुण्याला रवाना झाले.

उंट घेऊन बेळगावमध्ये आलेले लोक लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडले होते. लॉकडाऊन व सध्या सुरू असणाऱया पावसामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. गावी जाण्यासही पैसे शिल्लक नसल्याने हिंडाल्कोजवळील हायवे ब्रिजखाली मागील काही दिवसांपासून ते वास्तव्याला होते. खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याने दुर्दैवाने यातील एका उंटाचा मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी सहा उंट वास्तव्याला होते.

गुरुवारी रात्री 11 वाजल्यापासून पोलिसांनी उंटांच्या मालकांना त्रास देण्यास सुरुवात केली. उंट घेऊन येथून निघून न गेल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. पुन्हा काहीवेळाने पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. उंट मालक न गेल्याने रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी उंट मालकांना हुसकावल्याने त्यांनी जागा सोडण्याचा निर्णय घेतला. ब्रिजच्याशेजारी असणाऱया एका खुल्या जागेत त्यांनी रात्र काढली. भर पावसात उंटांसोबत कुडकुडत त्यांना रात्र घालवावी लागली.

सकाळी माझा धर्म पशु बचाव संघटनेच्या पदाधिकाऱयांनी पावसात भिजणारे उंट पाहिले. त्यांनी त्या उंटांना पुन्हा एकदा ब्रिजखाली आणले. रात्रभर पावसात भिजल्याने उंटांचे मालक व उंट थंडीने कुडकुडत होते. त्यांना खाद्यपदार्थ देऊन  औषधोपचार करण्यात आला. यासंदर्भात काही लोकांनी वरि÷ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता उंटांना हुसकावून लावण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे उंट हटवण्यासाठी काही पोलीस कर्मचारी का दबाव टाकत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर शुक्रवारी दुपारी उंटांना पुण्याला पाठविण्यात आले. उंटांना ट्रकमध्ये चढविण्यासाठी पेनची व्यवस्था करण्यात आली होती. कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी उंटांच्या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. उंटांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांना करण्यात आले.

रात्रीच निघून जाण्यासाठी पोलिसांकडून दमदाटी

गुरुवारी रात्री काही पोलिसांनी येथून निघून जाण्याची दमदाटी केली. रात्री 1 वाजेपर्यंत पोलिसांनी आम्हाला येथून जाण्यास सांगितल्याने आम्ही रात्री खुल्या मैदानावर गेलो. रात्र भिजत काढल्याने उंट व आमची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आमचाही विचार करावा, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

– रवी जगताप (उंट मालक)

Related Stories

रताळी आवक वाढल्याने दरात घसरण

Patil_p

मराठी भाषेतही फलक बसवा

Amit Kulkarni

अट्टल मोटार सायकल चोराला अटक

Rohan_P

बिम्सच्या डॉक्टरांना पुन्हा मारहाण

Patil_p

मास्क सक्तीसाठी पोलिसांचा बडगा

Patil_p

कृष्णाकाठ योजनेसाठी 10 हजार कोटी

tarunbharat
error: Content is protected !!