तरुण भारत

शहर परिसरात डेंग्यूचाही धोका

अनगोळ परिसरात सात रुग्ण आढळले, खबरदारी घेण्याची गरज

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला असतानाच बेळगावला डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. शहर व उपनगरांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे व्यापक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनगोळ परिसरात डेंग्यूचे सात संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. गेल्या वषी अनगोळ, मजगाव, शहापूर, वडगाव परिसरात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. यंदाही डेंग्यूचा संसर्ग सुरू झाला आहे.

या संबंधी मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या वषीही अनगोळ, मजगाव, शहापूर, वडगाव परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. आता कोरोना नियंत्रणात येत आहे. सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे डेंग्यूचे किती रुग्ण आहेत याचा तपाशील जमविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, जिल्हय़ात तीन ते पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप त्यांची आणखी तपासणी व्हायची आहे. नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास तातडीने उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

गाफील राहिलात तर धोका वाढणार जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी बेळगावकरांना पुन्हा धोक्मयाचा इशारा दिला आहे. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याची शक्मयता आहे. या काळात पुन्हा गर्दी वाढली, कसलीच खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराबरोबरच प्रत्येकांनी लस घेण्याला प्राधान्य द्यावे. घरातील वृद्ध व मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

येळ्ळूर प्रवेशद्वाराजवळील ‘तो’ कचरा हटवा ग्रामपंचायतने लक्ष देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Omkar B

प्रस्तावित योजनेतील फ्लॅटकरिता अर्ज भरण्यासाठी गर्दी

Amit Kulkarni

शिरसी-कुमठा रस्ता कामासाठी रास्ता रोको

Amit Kulkarni

वकिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार

Patil_p

सलग चौथ्या दिवशीही शास्त्रीनगर येथे शोधमोहीम

Patil_p

मंगळवारी जिल्हय़ात 29 जण कोरोना बाधित

Patil_p
error: Content is protected !!