तरुण भारत

पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 4 टक्क्यांवर

अनलॉकची प्रक्रिया सुरू, शुक्रवारी 139 नवे रुग्ण, पाच जण दगावले

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव जिह्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या अधिक असल्यामुळे सरकारने एक आठवडय़ाचा लॉकडाऊन वाढविला होता. आठवडय़ाभरात ही टक्केवारी 4 टक्क्मयांवर उतरली असून यामुळे सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी अधिकृत आदेश जारी करणार आहेत.

शुक्रवारी 139 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत बाधितांचा आकडा 74 हजार 252 वर पोहोचला आहे. शुक्रवारी 346 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 70 हजार 214 जण बरे झाले आहेत. तर 3 हजार 306 सक्रिय रुग्ण आहेत.

शुक्रवारी जिह्यातील पाच जण दगावले. मृतांचा आकडा 732 वर पोहोचला आहे. बेळगाव तालुक्मयातील दोन महिला, एक वृद्ध, हुक्केरी व सौंदत्ती तालुक्मयातील प्रत्येकी एक वृद्ध असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी बेळगाव शहर व तालुक्मयात 56 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

अद्याप 2,392 जणांचे अहवाल यायचे आहेत. आरोग्य विभागाने आतापर्यंत 9 लाखाहून अधिक जणांची स्वॅब तपासणी केली आहे. त्यापैकी 8 लाख 19 हजार 409 जणांचे अहवाल निगेटिक्ह आले आहेत. यासंबंधी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता जिह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 टक्क्मयांवर उतरली आहे. त्यामुळे 21 जूनपासून बेळगावात अनलॉकची प्रक्रिया होणार आहे. जिल्हाधिकारी यासंबंधी निर्णय घेणार आहेत, असे सांगितले.

हिरेबागेवाडी, मच्छे, हंदिगनूर, मंडोळी, निलजी, पिरनवाडी, अनंतशयन गल्ली, अनगोळ, टिळकवाडी, अशोकनगर, भारतनगर, हनुमाननगर, विजयनगर, जयनगर-हिंडलगा, वडगाव, गांधीनगर, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शहापूर, शास्त्राrनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, विजयनगर, वीरभद्रनगर, नाथ पै नगर, कुमारस्वामी लेआऊट परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

170 जणांवर कारवाई

लॉकडाऊनच्या काळात बेळगाव शहर व उपनगरांमध्ये विनामास्क फिरणाऱया 170 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 26 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.

Related Stories

बहुभाषिक काव्यसंमेलनात बेळगावच्या तीन कवयित्रींची निवड

Patil_p

बडय़ा थकबाकीदारांच्या आस्थापनांसमोर हलगी वाजवा

Patil_p

आजपासून तीन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन

Omkar B

बेला प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन

Patil_p

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात आता दोन वाघ दाखल

Omkar B

निपाणीत उरुसास अत्यल्प गर्दी

Patil_p
error: Content is protected !!