प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रातील घोटेली नंबर दोन येथील राजेश बार नजीक असलेल्या घरावर फणसाचे झाड कोसळून नुकसान झाले. त्याचप्रमाणे त्यांच्या संरक्षण कुंपणाची नुकसानी झालेली आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन हजारो रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले. याबाबतची माहिती अशी की, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केरी पंचायत शेतातील गोटेली येथील राजेश बार यांच्या शेजारी असलेल्या घरावर फणसाचे झाड पडले. यामुळे घराच्या एका दर्शनी भागाची नुकसानी झाली. त्याचप्रमाणे सदर झाड संरक्षण कुंपणावर पडल्यामुळे नुकसानी झाली.
याबाबतची माहिती वाळपईच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेला मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन घरावरील झाड हटविले. यामुळे लाखो रुपयांचे मालमत्ता वाचली.