नंदगड : कसबा नंदगड (ता. खानापूर) येथे राहत्या घरावर झाड कोसळून घराचे व संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. कसबा नंदगड येथील आंबेडकर गल्लीत नंदिनी गणपती मादार यांचे घर आहे. घराजवळच फणसाचे झाड होते. बुधवारी सकाळपासूनच पाऊस पडत होता. दुपारी पावसासह वाराही मोठ्या प्रमाणात सुटला. वाऱ्यामुळे घरासमोर असलेले फणसाचे झाड घरावर कोसळले. आवाज येताच नंदिनी मादार यांनी प्रसंगावधान राखून घराबाहेर पडून आपला जीव वाचवला. घरावर झाड पडल्याने घरावरील छपराचे सिमेंटचे पत्रे तुटले आहेत. पत्रे तुटल्याने पावसाचे पाणी घरात शिरले. पावसाचे पाणी टीव्हीवर पडल्याने टीव्ही नादुऊस्त झाला आहे. कपडे व इतर संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
Previous Articleलेफ्टनंट जनरल गुरुबिरपाल सिंग यांची एनसीसी कार्यालयाला भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.