प्रतिनिधी /वाळपई
गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱया पावसामुळे सोमवारी मध्यरात्री पर्ये घोलवाडा येथील पार्वती महादेव गावकर (78) या महिलेच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान. सदर महिला या घरात एकटीची राहत असून आता तिच्या समोर ऐन पावसाळय़ा निवाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत आहे. सोमवारी मध्यरात्री पार्वती महादेव गावकर ही एकमेव राहत असलेले घराची भिंत कोसळली. यामुळे तिची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. सध्या ती बेघर झालेली आहे. उर्वरित भिंतीही कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे तिच्यासमोर बेघर होण्याची पाळी आली असून या संदर्भात सरकारने व स्थानिक आमदारांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
‘त्या’ वृद्ध महिलेला सरकारने आर्थिक मदत द्यावी!
पार्वती गावकर या एकटय़ाच त्या घरात राहत असून अत्यंत जुने आहे?. भिंती मातीच्या आहेत. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला, अशी माहिती पार्वती गावकर यांनी दिली. अचानक एका बाजूची भिंत कोसळल्यामुळे आपल्या घराची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. सध्या तरी सदर घरात राहणे अत्यंत धोकादायक आहे. इतर भांती कोसळण्याची शक्मयता आहे. यामुळे सध्या आपल्याला आसरा नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. यामुळे सरकारने आपल्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी पार्वती गावकर यांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनीही सरकारने या घटनेची दखल घेऊन त्या वृद्ध महिलेला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.