Tarun Bharat

पार्सेत झाडे कोसळून वीज खात्याचे नुकसान

प्रतिनिधी /पेडणे

वायंडोंगर पार्से येथे शनिवारी सकाळी मुख्य रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर, भेंडीचे झाड, माड आणि आकाशी झाड पडल्याने वीज खात्याचे मोठे नुकसान झाले. 

  पेडणे अग्निशामक दलाला सकाळी ही घटना घडल्याचे कळताच अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी सुनील देसाई हे आपल्या जवानांसह घटनास्थळी हजर झाले. अग्निशामक दलाला बरीच मेहनत घ्यावी लागली.

 पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कटरचा वापर करून रास्ता मोकळा केला व वीज वाहिन्या बाजूला केल्या. या मोहिमेत अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी सुनील देसाई, चालक मथिएस मेंडोंसा, जवान अमोल परब, जवान यशवंत नाईक आणि नगर पालिकेचे कामगार यांनी चांगली कामगिरी केली.

Related Stories

कुशावतीला पुन्हा पूर, पूल-रस्ता पाण्याखाली

Amit Kulkarni

पाणी पुरवठय़ाबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या !

Omkar B

बेकायदेशीर बांधकाम वाळपई नगरपालिकेने हटविले

Amit Kulkarni

पोलीस व सर्व सरकारी यंत्रणांनी कठोर व्हावे.

Patil_p

चर्चिल-आलेक्स ने पाहिला ‘मन की बात’ कार्यक्रम

Amit Kulkarni

कोकण मराठा सांस्कृतिक संघाचा वर्धापनदिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!