Tarun Bharat

जांभूळ झाड कोसळून रिक्षाचे नुकसान

Advertisements

सरोदे कॉलनी-हिंदवाडी येथे घटना

प्रतिनिधी /बेळगाव

झाडाशेजारी रिक्षा लावून घरात गेले असता अचानक जांभूळ झाड रिक्षावर कोसळले. त्यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याची घटना सरोदे कॉलनी, हिंदवाडी येथे घडली आहे. यामध्ये जवळपास 90 हजारांहून अधिक रुपयांचे रिक्षाचे नुकसान झाले आहे.

अंकुश वसंतराव पवार यांनी अलीकडेच नवीन रिक्षा घेतली होती. त्यांनी केए 22 बी 4143 ही रिक्षा घराशेजारीच उभी केली होती. त्यावेळी पावसामुळे अचानक जांभळाचे झाड उन्मळून पडले. हे झाड रिक्षावरच कोसळल्याने रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या गरीब रिक्षाचालकाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

202 व्यवसाय परवान्याचे सोळा दिवसांत वितरण

Amit Kulkarni

अनगोळ परिसरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम त्वरित पूर्ण करा

Patil_p

राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे सुमारे 300 कोटीची उलाढाल ठप्प

Amit Kulkarni

दुर्गामाता दौड मोठय़ा प्रमाणात साजरी करणार

Amit Kulkarni

महिलांच्या जलतरण स्पर्धेत हिमानी जाधवला रौप्य

Amit Kulkarni

श्री कपिलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी विश्वस्त मंडळ कार्यरत

Patil_p
error: Content is protected !!