अडीच लाखांचे नुकसान : पावसाचा जोर कायम
प्रतिनिधी /डिचोली
मुसळधार पावसाच्या तडाख्यात डिचोली तालुक्मयातील नार्वे व वेळगे गावात दोन घरे कोसळून सुमारे अडीच लाखांची हानी झाली, अशी माहिती मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी दिली.
मर्मवाडा नार्वे येथील वासंती वसंत चोडणकर यांचे मातीचे घर पूर्णपणे कोसळून दोन लाखांची हानी झाली. घरातील सर्व सामानाची नासधूस झाली. तसेच पावसाने भिजल्यामुळे सामान निकामी झाले. घराचे संपूर्ण छप्परच कोसळल्याने त्यांच्या निवाऱयाचे साधनच हिरावले गेले आहे.
दुसऱया एका घाटनेत वेळगे गाववाडा येथील लीला वेळगेकर यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. घर पडलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी पडझड झाली असून अग्निशामक दलाचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत. तसेच तलाठी नुकसानीचा आढावा घेत आहेत. डिचोली मामलेदार कार्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सतर्क ठेवण्यात आला आहे.