Dandeshwar Jatrotsav on 16th January
मालवण – :
दांडी येथील श्री देव दांडेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार १६ जानेवारीला होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि रात्री १२ वाजता पार्सेकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दांडी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.