Tarun Bharat

पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- राहुल रेखावार

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रात पाऊस वाढल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता आहे. म्हणूनच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी तलाठी व ग्रामसेवकांच्या संपर्कात राहावे
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान सायंकाळी चार वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २६फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.

Related Stories

`ऍस्टर फ्री इन’ गोरगरीबांसाठी वरदान ठरेल : ग्रामविकासमंत्री मुश्रीफ

Archana Banage

सातार्डे येथे महिला पोलीस पाटीलला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; दुसरा अर्ज कोणाचा? वाचा सविस्तर…

Archana Banage

राजर्षी छत्रपती शाहू राजांना भारतरत्न पुरस्कारासाठी पाठपुरावा करू : खासदार शेट्टी

Archana Banage

सातवेसह नदीकाठच्या २३० गावांचा कुषीपंप वीजपुरवठा खंडित

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : आयजीएम रुग्णालयात कोरोना लसीकरणास सुरुवात

Archana Banage
error: Content is protected !!