Tarun Bharat

पावसामुळे कुठ्ठाळीतील महामार्गावर दरड कोसळण्याचा धोका

प्रतिनिधी /वास्को

कुठ्ठाळी ते वेर्णापर्यंतच्या महामार्गावरील डोंगर कडा कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हल्लीच या मार्गावर दरड कोसळून वाहतुक  अडचणीत आली होती. सध्या पाऊस जोरदार पडत असल्याने डोंगराच्या उंच कडा कोसळण्याचा धोका बळावला आहे.

Advertisements

कुठ्ठाळीतील नवीन महामार्ग तसेच तेथील नवीन बांधण्यात आलेला उड्डाण पुलाने सततच्या पावसामुळे धोका आणि अडचण निर्माण केलेली आहे. आधीच या ठिकाणी पुलाखालील रस्ता पावसाच्या पाण्याने भरत असतो. तसेच या पाण्याचा धोका तेथील घरांनाही सतावत आहे. पुलावरूनही पाणी खालीस कोसळत असल्याने अडचणीत वाढ झालेली आहे. कुठ्ठाळीतील केसरव्हाळ जवळच्या महामार्गाच्या बाजुला उंच डोंगर आहे. रस्ता तयार करताना हा डोंगर कापण्यात आलेला आहे. सततच्या पावसामुळे आता या डोंगराच्या कडा कोसळू लागल्या आहेत. हल्लीच दरड कोसळून महामार्गावर आली होती. आता उंचावरील दरडही कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. सदर डोंगराची माती भुसभुशीत असल्याने ती हळुहळु खाली उतरत आहे. दरड कोसळल्यास या महामार्गावरील वाहतुक धोक्यात येऊ शकते.

Related Stories

शापोरा टी-10 क्रिकेटमध्ये जय गणेश, आर्मस्ट्राँग अंजुणा, ओशन किंग्सचे विजय

Amit Kulkarni

एनजीओंचा विरोध ठरतोय विकासमार्गातील आडकाठी

Amit Kulkarni

मये भु वि. नागरिक कृती समितीने आमदाराविरूध्द थोपटले दंड

Amit Kulkarni

बोर्डांने सर्व संबंधितांवर कारवाई करावी : सावईकर

Omkar B

एटीएमद्वारे पैसे चोरणाऱया चोरटय़ांना म्हापशात अटक

Patil_p

माशेल, कुंभारजुव्यातील गणपती देखावे रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!