काकतीवेस परिसरात गटार स्वच्छता मोहीम : कामाचा निधी लाटण्याचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाचे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरून वाहण्याचे प्रकार निदर्शनास येतात. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी गटारीची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. याची दखल घेऊन महापालिकेने काकतीवेस परिसरात गटार स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र याकरिता गटारीवर घालण्यात आलेले काँक्रीट आणि फरशा हटविण्यात आल्या आहेत. या गटारी उघडय़ा ठेवण्यात आल्याने धोका निर्माण झाला आहे.
गटारींची स्वच्छता वेळोवेळी केली जात नाही. परिणामी शहर आणि उपनगरातील गटारी कचऱयाने तुडूंब भरल्या आहेत. परिणामी पावसाचे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरून वाहत असल्याचे निदर्शनास येते. तर दरवषी वळीव पाऊस आणि पावसाळय़ाच्या सुरुवातीस गटारीमधील कचरा रस्त्यावर येऊन साचतो. मात्र काही ठिकाणी नागरिकांनी उघडय़ा गटारीवर सुरक्षेच्या कारणास्तव झाकणे, काँक्रीट आणि फरशा घातल्या आहेत.
कचरा काढण्यास अडथळा
परिणामी कचरा काढण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. नियमितपणे गटारीतील कचऱयाची उचल केल्यास ही समस्या निर्माण होत नाही. मात्र महापालिकेकडून नियमितपणे गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत.
शहरवासियांना फटका
कचऱयाची उचल करण्यासह गटारी स्वच्छतेसाठी कोटींच्या निविदा काढल्या जातात. मात्र प्रत्यक्षात केवळ कचऱयाची उचल केली जाते. गटारी स्वच्छतेचे काम व्यवस्थितपणे केले जात नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर गटारी स्वच्छ केल्या जातात. त्यामुळे गटारींच्या स्वच्छतेच्या कामाचा निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे. पण याचा फटका शहरवासियांना बसत आहे. नियमितपणे गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव गटारीवर झाकणे, फरशा, काँक्रीट घातले आहे. मात्र पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर गटारी स्वच्छतेसाठी घालण्यात आलेली झाकणे, फरशा आणि काँक्रीट हटविण्यात येत आहे.
गटारीवरील काँक्रीट फोडण्यात आल्याने नाराजी
वर्षातून एकदा स्वच्छता करण्यासाठी काँक्रीट फोडण्यात येत असल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. नियमितपणे स्वच्छता करण्यासाठी चेंबर ठेवून गटारीवर झाकणे घालण्याची आवश्यकता आहे. पण महापालिकेकडून गटार स्वच्छता केली जात नसल्याने कायमस्वरुपी झाकणे घालण्यात आली आहेत. पण काकतीवेस परिसरात काँक्रीट फोडण्यात आल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेचा भाग असल्याने गटारीमध्ये कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे ही झाकणे घातलेली असतात. पण महापालिकेकडून वर्षातून एकदा राबविण्यात येणाऱया स्वच्छता मोहिमेसाठी काँक्रीट फोडण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.