Tarun Bharat

वडगाव-धामणेतील बळ्ळारी नाल्यावर वाहनांना धोका

वार्ताहर /धामणे

वडगाव ते धामणे रस्त्यावरील बळ्ळारी नाल्यातील गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढत असताना ब्रिजचा काही भाग पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे येथील वाहनधारक आणि नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे बळ्ळारी नाल्याला पूर येऊन वडगाव-धामणे रस्त्यालगत बळ्ळारी नाल्याशेजारी शेकडो एकर शिवारात पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचले.

त्यामुळे शेतकऱयांचे भात पीक पाण्याखाली येऊन प्रतिवर्षी मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचे कारण म्हणजे वडगाव-धामणे रस्त्यावरील बळ्ळारी नाल्यावर जुना ब्रिज सिमेंट पाईप घालून बांधण्यात आला आहे. मोठय़ा पावसात या पाईपातून पाण्याचा विसर्ग होत नाही. याशिवाय मोठी अडचण म्हणजे बळ्ळारी नाल्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ उन्हाळय़ात काढण्यात आला असता तर ही समस्या उद्भवली नसता

Related Stories

गांधीनगरमध्ये गॅसवाहिन्यांद्वारे गॅसपुरवठा करा

Amit Kulkarni

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे विद्यार्थ्यांना मदत

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 420 जणांना कोरोनाची लागण

Patil_p

मनपा विभागिय कार्यालयात चलन देण्याची प्रक्रिया पुन्हा ठप्प

Patil_p

नवीन आर्थिक वर्षात लोकमान्य सुवर्ण अंकुर योजनेस प्रारंभ

Amit Kulkarni

पोलीस अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या

Amit Kulkarni