वार्ताहर /उसगांव
उसगांव वडाकडे सर्कल येथे प्राथमिक शाळेजवळील रस्त्यावर भले मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहतूकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे.
शनिवारी या खड्डय़ात एक दुचाकी महिला पडून जखमी झाली. चारचाकी वाहन चालकांनाही गाडी चालविताना सर्कस करावी लागते. वडाकडे सर्कल, फार्मसीसमोर, उसगांव-फोंडा मार्ग या रस्त्याची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत लक्ष घालावे. पंचायत मंडळ सध्या अस्तित्वात नाही त्यामुळे प्रशासकांनी रस्त्याची किमान डागडुजी तरी करावी अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.