दापोली प्रतिनिधी
दापोली शहरातील पोलीस स्थानकाला शनिवारी सकाळी अचानक आग लागली.सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानकातून अचानक धुराचे लोट येऊ लागले.हे पाहताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते.यामुळे आग विझवता आली नाही. यानंतर दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले असता ही आग आटोक्यात आली मात्र आगीमध्ये नेमकी किती व कोणत्या प्रकारची हानी झाली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
Advertisements